दुपार सरल्याबरोबर आम्ही समुद्र किनाऱ्यावर गेलो विश्रामगृहावरून समुद्राकडेजाताना मध्ये काही घर होती. आमच्या चाहुलीमुळे त्या घरातली काही मुलं लगबगीनेबाहेर आली एखाद्या छोट्याशा ठिकाणी असणाऱ्या मुलांना शहरातली माणसं पाहून जीउत्सुकता आणि लाजरेपणा वाटतो तो सगळा ऐवज घेऊन ती मुलं आमच्या मागोमागसमुद्र किनाऱ्यावर यायला लागली आधी जरा बुजत बुजत येत होती पण आम्ही हसतोयबोलायचा प्रयत्न करतोय हे पाहिल्यावर त्यांची भीड चेपली आम्ही ६ जण होतो आम्हीवाळूत बसल्यावर ती झुंबड सुद्धा आमच्यापासून काही अंतरावर बसली आणि एकमेकांशीखुसपूस अर्थातच त्याचा विषय आम्हीच असणार आमच्या कपड्यांपासून ते आमच्याभाषेपर्यंत सगळंच त्यांना नवीन. अगट्टी बेटावर १००% मुस्लिम धर्मीय आहेत त्यामुळेछोट्या मुलींचे डोके सुद्धा झाकलेले. मुलांचाही पोशाख पूर्ण बाह्यांचा शर्ट आणि पायजमाअसाच त्यामुळे टी शर्ट आणि आखूड पॅण्ट घातलेले पुरुष आणि बायका हि त्यांच्यासाठीक्वचितच दिसणारी गोष्ट. लक्षद्वीप बेटांवर जास्त पर्यटक जात नाहीत. जे जातात त्यातहीअगट्टी बेटावर जाणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी. त्या मुलांची हसाहशी चालू होती आमचात्यांच्याशी बोलायचं प्रयत्न चालू होता तेवढ्यात एक ९-१० वर्षांची डोक्यावर हिजाबअसलेली एक मुलगी आली ती आधी या सगळ्या मुलांकडे जरा रागानेच पाहत होतीलहानसशा बेटावर राहणाऱ्या बाहेरच्या जगाशी अगदी क्वचित संबंध येणाऱ्या लहानमुलीच्या मनात शहरातल्या माणसांबद्दल जी असुरक्षितता असेल तीच असुरक्षिततातिच्या चेहेऱ्यावर दिसत होती. त्या सगळ्या मुलांना शक्यतोवर आमच्यापासून लांबघेऊन जायचा तिचा विचार होता पण ती पोरं काही तिला दाद द्यायला तयार नव्हतीआमच्याकडे असणारे मोबाईल फोन,कॅमेरा ह्यांचा त्यांना खूप आकर्षण वाटत होत .आमच्याकडे काय काय खाण्याचे पदार्थ होते ते आम्ही त्या मुलांना देऊ केल्याबरोबर हिहिजाबवली मुलगी एकदम सावध झाली आणि त्या मुलांना दटावयाला लागली कि काहीघ्यायच नाही पण ती मुलं कसली ऐकतात आमच्याकडच्या वस्तू संपेपर्यंत कोणीही तिथूनजायला तयार नाही त्या मुलीने मात्र काही घेतल नाही आमच्याकडून. अंधार पडायलालागल्यावर मुलांना त्यांच्या घरातून बोलावणी यायला लागली आणि अंधार पूर्णपडायच्या आत सगळी मुलं गायब . समुद्राचा चमचमणार पाणी थंडगार वाळू समुद्राचीगाज आणि आम्ही . हिंदी महासागरातल्या एका छोट्याशा बेटावरचा दिवस संपला होताशहरातून आलेल्या ६ पर्यटकांमुळे त्या बेटावरच्या मुलांची संध्याकाळ वेगळी झाली होतीत्या मुलांनी कधी अगट्टी बेटापलीकडचं जग पाहिलंच नव्हत अगट्टी बेटावर रोज येणारविमान आतून कस दिसत हे सुद्धा त्या मुलांना माहित नव्हत. अगट्टी बेटावर येणाऱ्या वस्तूज्या कोचीनवरून येतात त्या कोचिनला कधी जायला मिळणं हि सुद्धा त्या मुलांसाठी फारफार मोठी गोष्ट होती
दुसऱ्या दिवशी हवामान खराब असल्यामुळे आम्ही अगट्टी बेटावरच अडकून पडलोदुसऱ्याच दिवशी नाही तर पुढचे सलग ४ दिवस मुसळधार पावसामुळे आम्हाला दुसऱ्याकुठच्याही बेटावर जाता आल नाही त्यामुळे सकाळ संध्याकाळ अगतीच्यासमुद्रकिनाऱ्यावर आमचा मुक्काम सकाळच्या वेळेत मुलं शाळेत असायची. संध्याकाळीमात्र सगळा लवाजमा आमच्या सोबतीला समुद्रकिनाऱ्यावर असायचा. पहिल्या दिवशीच्याखाऊ मुले दुसऱ्या दिवशी जास्त मुलं आलेली होती आज काही बायका सुद्धा डोक्यावरचेहिजाब सांभाळत आलेल्या होत्या . मी मात्र त्या कालंच्या हिजाबवल्या मुलीची वाट पाहतहोते थोड्या वेळाने ती आली आज तिच्या चेहेऱ्यावर कालचा कडकपणा नव्हता आजयेतानाच तिने आम्हाला थोडं हसूनही दाखवल आम्ही दिलेला खाऊ घेतला आणि चक्क थँकयू म्हटलं . आज तिच्या डोळ्यात उत्सुकता होती आमच्याशी तिला बोलायचं होतं. कायबोलायचं असेल तिला आमच्याशी ?आम्ही कुठून आलो ? आमच्या गावालाही असा समुद्रआहे का?आम्ही असे वेगळे कपडे का घालतो?आम्ही शाळेत गेलो होतो का?तिच्यासारखाहिजाब आम्ही २ बायका का घालत नाही? काय माहित तिला काय बोलायचं होत. आम्हीनेम?स्कुल?असे तोडके मोडके इंग्रजी आणि हिंदी वापरून बोलायचं प्रयत्न करत होतोतिला थोड फार इंग्रजी येत होतं . तिने शाळेचं नाव सांगितलं तिचा भाऊ होता तो भाऊ आहेहे सुद्धा सांगितलं एवढा संवाद होतोय तोवर तिला घरातून बोलावणं आलं . तिला बोलावलंहे तिलाच कळलं आम्हाला तिच नाव कळलंच नाही ती जायला निघाल्यावर तिचा भाऊकाही जायला तयार नव्हता पण मोठ्या बहिणीच्या समजूतदारपणे ती त्याला समजावूनघेऊन गेली मी हिंदी महासागरातल्या त्या बेटाच्या ठिपक्यावर बसून विचार करत राहिलेकाय करेल आता हि मुलगी घरी जाऊन? तिला घरात काय काय काम करावी लागतील? याछोट्याशा बेटावरच्या तिच्या आयुष्याचा अर्थ काय ?मी हक्काची रजा घेऊन खूप पैसे खर्चकरून इथे सुट्टीवर आले आहे त्या माझा आणि ह्या मुलीचा काय संबंध? हिच्यात आणिमाझ्यात काय धागा आहे ? माझी ४ दिवसांची सुट्टी संपवून मी एका महानगरातल्यापसाऱ्यात विरघळून जाईन आणि हि ह्या बेटावरच्या संथ जीवनप्रवाहात.
दुसऱ्या दिवशी आम्हाला किनाऱ्यावर जाता आलं नाही माझं मन त्या हिजाबवल्यामुलीभोवती घोटाळत राहिल.ती काय करत असेल तिने आमची वाट पहिली असेल कासंध्याकाळी? त्या नंतरच्या दिवशी बाकी मुलं आली पण हिजाबवाली मैत्रीण नाही आली.मी मोडक्या भाषेत चौकशी केली मला धड काही कळलं नाही पण तिला घरात काम असावअसा अंदाज मला आला. तिने काय ते काम संपवावा आणि यावं इथे या किनाऱ्यावर असमला खूप वाटत राहिल पण त्या दिवशी ती नाहीच आली. त्या नंतरचा दिवस हा आमचाअगट्टी बेटावरचा शेवटचा दिवस होता मी अगदी लगबगीने किनाऱ्यावर गेले. आम्हीपोचल्यावर थोड्याच वेळात हिजाबवाली मैत्रीण आली . हसत हसत. मी तिला माझ्याकडचीचकली दिली तिने ती खाल्ली आणि गम्मत म्हणजे अजून मागितली हाताने सांगितलंसुद्धा छान आहे म्हणून . ती मोडक्या तोडक्या भाषेत काहीबाही बोलली मला फक्तकोचीन,लॉट ऑफ स्टडी असे काही शब्द कळले. समुद्रावर आणि किनाऱ्यावर आता अंधारदाटायला लागला होता आज अजून तिला बोलावणं आल नव्हत आज तिचा भाऊ सुद्धानव्हता मी तिला म्हणाले मी उद्या परत चालले तिच्या चेहेऱ्यावर उदास हसू आल. अनादीअनंत काळापासून माणसांची एकमेकांशी ताटातूट होत आली आहे त्या ताटातुटीवेळचीअस्वस्थता,हुरहूर तिच्या छोट्याशा डोळ्यांमध्ये भरून आली होती. या क्षणाचा सामनाकसा करावा या संभ्रमात मी असतानाच ती अचानक उठली आणि बाय म्हणून निघाली मीभानावर आले तेव्हा मला अचानक जाणवल कि आपण हिला हिचं नावच नाही विचारलगेल्या ४ दिवसात. मी जिवाच्या आकांताने ओरडले नेम?नेम? तिला प्रश्न कळला .वाऱ्याबरोबर माझ्या कानावर शब्द आले मुसाफिरा !
तिला आणि मला जोडणारा धागा होता माणसाच्या शोधक वृत्तीचा. नवीन अनुभवघेण्याच्या उत्सुकतेचा. त्या बेटावरच्या मुलांच्या आयुष्याबद्दलची माझी उत्सुकता आणिशहरातल्या माझ्या आयष्याची उत्सुकता याचा पोत सारखाच होता. माणसं जीवनप्रवाहातअनेक ठिकाणी जात राहतात अनेक किनार्याना लागत राहतात. एखाद्या किनाऱ्यावरमुसाफिरा भेटते. जीवनाच्या प्रवाहीपणाची आणि साचलेपणाची एकाचवेळी आठवणकरून देणारी! एका बेटावर स्थिर राहूनही हिंदी महासागराच्या लाटांबरोबर स्वप्नपाहणारी पाहू शकणारी मुसाफिरा . भाषेशिवाय दोन माणसांमध्ये धागा जुळवणारीमुसाफिरा. अगट्टी बेटावरून मी जेव्हा माझ्या महानगरात पोचेन तेव्हा त्या बेटावरच्याशांत,स्थिर आणि काहीशा कंटाळवाण्या जगण्याची मला आठवण करून देत राहीलमुसाफिरा. कधीतरी मी संध्याकाळच्या हुरहुरीच्या वेळी एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर जाईनतेव्हा समोरच्या लाटांबरोबर माझ मन पोचेल मुसाफिराकडे.,ती काय करत असेल?तिलाकोचिनला जायला मिळेल का?तिला लॉट ऑफ स्टडी करायला मिळेल का? मुसाफिरा मलापरत कधी भेटण्याची शक्यता जवळ जवळ नाहीच. माणसं भेटतात दुरावतात हळव्याक्षणी आठवत राहतात हा नियमच आहे जगण्याचा. त्याची मला सतत जाणीव करून देतराहील मुसाफिरा .
Waah!
ReplyDeleteMusafira tula bhetel ka mahit nahi. Pan Musafira sarkhya muli kinva mula kuthe na kuthe bhetatilach. Tujha lekh wachun mala aamhi lahanpani Dhamapur la jaycho te aathvala. Tithehi bayka aani mula aamchya baghat rahayche. Kahise ghabarlele aani curious suddha. Gadi pahayla dhavat yayche.
ReplyDeleteRasika mala pan athawatahet. (Ashwini Padhye)
Deleteमुसाफिराला न भेटूनसुद्धा प्रत्यक्ष भेटीचा आनंद मिळाला. पु. लंच्या व्यक्ती आणि वल्ली वाचून मिळतो तसा!(अश्विनी पाध्ये)
ReplyDeleteRefreshed exotic Lakshadweep holidays
ReplyDeleteRefreshed exotic Lakshadweep holidays
ReplyDelete