Friday, 9 November 2018

पाणीच पाणी चहूकडे ....





स्वित्झर्लंड  म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहातात बर्फाच्छादित शिखरं , उंग फ्राऊ , तिथली प्रसिद्ध केबल कार, रोलेक्स घड्याळं , स्विस चॉकोलेट , स्विस चीझ, स्विस नाईफ.  युरोप पर्यटनातला महत्त्वाचा भाग म्हणजे स्वित्झर्लंड. त्यामुळे मी १५ दिवस ट्रेनिंगसाठी स्वित्झर्लंडला जाणार म्हटल्यावर माझ्यावर सूचनांचा वर्षाव झाला. कोण म्हणे जिनिव्हा पाहिलंच पाहिजे, कोण म्हणे १५ दिवस स्वित्झर्लंड मग जुंग फ्राऊला तर गेलंच पाहिजे. तर असे बरेचसे सल्ले , सूचना मनात ठेवून मी उतरले झुरिक विमानतळावर आणि तिथून टॅक्सीने बर्नला . माझं  दोन आठवडे युनिव्हर्सिटी ऑफ बर्नमध्ये ट्रेनिंग होतं . युनिव्हर्सिटी हॉस्टेल मध्ये सामानसुमान ठेवून थोडं फ्रेश होऊन मी निघाले बर्न शहर पाहायला. बर्न   शहरामध्ये आधुनिकता आणि ऐतिहासिकता यांचा सुंदर मिलाफ आहे. सोळाव्या शतकात बांधलेले जवळ जवळ ६ किमी लांबीचे मार्केट इथे आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगेने पण एकमेकांना अगदी लगटून असणारी दुकानं . या दुकानांच्या पुढे प्रशस्त फूटपाथ . या फूटपाथला सुद्धा वरून मजबूत आच्छादन . ऊन असो,पाऊस असो किंवा बर्फ असो या फुटपाथवरून तुम्ही आरामात फिरू शकता. प्रत्यक्ष खरेदी किंवा नुसतंच विंडो शॉपिंगही करू शकता. या मार्केटमध्ये  फेरफटका मारत मी एका चौकात पोचले. या चौकाच्या एका बाजूला स्वित्झर्लंडच पार्लमेंट आहे , एका बाजूला स्विस बँक आहे. पण या चौकातली लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे इथे  कारंजी . मी जेव्हा तिथे पोचले तेव्हा संध्याकाळचं ऊन होतं . स्वित्झर्लंडमधला उन्हाळा सुरु होता. लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे या कारंज्यात भिजायचं आनंद घेत होते. माझ्या १५ दिवसांच्या बर्नमधल्या मुक्कामात जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा मी या कारंज्यांच्या भोवतालचा  सोहोळा अनुभवला. थोडं पुढे गेलं  उतरून पार्लमेंटच्या मागच्या परिसरात आपण पोचतो . पार्लमेंटच्या इमारतीला एक छान फेरी मारताना एक सुंदर निर्झर दिसला. आता तुम्हाला प्रश्न पडेल की पार्लमेंटमध्ये निर्झर कुठून आला? तर निर्झर म्हणजे झऱ्याचं पाणी पिण्याची सोय केलेली होती. झऱ्याचं पाणी एका नळातून होतं आणि  सांडणार पाणी झर्याला पुन्हा मिळत होतं . पाणी छान थंड आणि चव असणारं  होतं . आपल्या देशात बऱ्याच शहरांमधून   मिळणाऱ्या प्यायच्या पाण्याला काहीही चव नसते. त्यामुळे बर्नसारख्या शहरात असं चवदार पाणी सहज प्यायला मिळालं ही माझ्याचसाठी आश्चर्याची आणि आनंदाची गोष्ट होती. मला पुढच्या एक दोन दिवसातच हे लक्षात आल की इथे फिरायला जाताना किंवा युनिव्हर्सिटीत लेक्चरला जाताना पाण्याची बाटली घेऊन जाण्याची गरज नाही. रिकामी बाटली असली की पुरे. इथे जागोजागी असे ताज्या,नैसर्गिक पाण्याचे निर्झर आहेत.  आपण आपली पाण्याची बाटली भरून घ्यायची आणि ताज्या चवदार पाण्याने खूष व्हायचं . 


बर्न आणि झुरिक या दोन्ही शहरात अशी पिण्याच्या पाण्याची सुंदर व्यवस्था जागोजागी दिसते. मी कुठेतरी वाचलं की झुरिक शहरात १००० होऊन   अधिक निर्झर  आहेत. बर्न तर सिटी ऑफ फाउंटन्स म्हणून प्रसिद्ध आहे . हे निर्झर खूप जुने आहेत . अगदी १६-१७  शतकापासून ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चालत आलेली आहे. बर्न शहरातल्या मार्केट परिसरात एक वेगळाच निर्झर आहे, यात उंचावर एका राक्षसाचा पुतळा आहे हा राक्षस लहान बाळाला खाताना दिसतो . अशा या राक्षसाला मराठीत काही विशेष नाव असल्याचं मला माहीत नाही. इंग्लिशमध्येही याला ऑगर म्हणतात . इथल्या एका स्थानिक गाईड बाईनी आम्हाला सांगितल्या या पुतळ्याच्या मागच्या अनेक थिअरीज . पण मला सर्वात गम्मत  कशाची वाटली तर हट्ट करणाऱ्या मुलांना घाबरवण्यासाठी ह्या पुतळ्याचा पालकांना खूप उपयोग होतो. कल्पना करा, आई बाबा उत्साहाने खरेदीला निघाले आहेत आणि त्यांचं गोंडस बाळ हट्टीपणा करत रस्त्यावर फतकल मारून बसलं आहे. अशावेळी हा राक्षस तुला खाईल हं , ही धमकी नक्की काम करणार. 

 पिण्याच्या पाण्याचे हे निर्झर अतिशय कलात्मक पद्धतीने बांधलेले दिसतात . इतिहासाच्या अभ्यासकांना बर्न किंवा झुरिक शहरांच्या अभ्यासात ह्या निर्झरांचा नक्की उपयोग होणार.  ह्या निर्झरांवर असणारे पुतळे किंवा प्राणी,पक्षी , इतर नक्षी ह्यातून त्या वेळच्या सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. काही निर्झर तर संपूर्णतः लाकडाने बांधलेले आहेत. असे निर्झर मला प्रामुख्याने शहरांच्या बाहेरच्या भागात दिसले. एका शेती खूप असणाऱ्या गावात मी एक लाकडाचा निर्झर पाहिला. तिथलं पाणी अगदी नितळ आणि चवदार होत. 


मी ज्या बर्न विद्यापीठात ट्रेनिंग घेत होते तिथे आमच्या क्लासरूमच्या जवळही एक निर्झर होता . या निर्झराला सेन्सरही होते. म्हणजे त्या  ठराविक अंतरावर आम्ही पोचलो की नळातून पाणी वाहायला लागायचं.  लेक्चरच्या मध्ये ब्रेक असला की इथे येऊन बाटलीत पाणी भरायचं आणि गप्पा मारायच्या हा आमचा ठरलेला कार्यक्रम होता.  बर्न शहरातून किंवा झुरिकमधून फिरताना असे झरे दिसले की नेहेमी माझ्या मनात यायचं , या झऱ्यानी सुख दुख्खाच्या किती गंपावा इतकी वर्षं ऐकल्या असतील. हातात हात घालून फिरणारी तरुण जोडपी , एकमेकांना आधार देत टुकूटुकू चालणारी वयस्कर जोडपी , मित्र मैत्रिणींबरोबर फिरायला निघालेले तरुण तरुणी , माझ्यासारखे पर्यटक अशा कितीतरी लोकांनी या पाण्याचा आस्वाद घेतला असेल. आमच्या चर्चा , गप्पा ऐकल्या असतील. वर्षानुवर्षे वाहणारे हे निर्झर एका अनौपचारिक इतिहासाचे साक्षीदारच आहेत की. 


  पाण्याच्या ह्या निर्झरांनी माझी १५ दिवस छान सोबत केली. आपल्या देशात दुर्दैवाने बहुतेक सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये असं स्वच्छ , ताज पाणी आता मिळत नाही. चव नसणाऱ्या पाण्याची आपल्याला सवयच झाल्यासारखी आहे. आपण पाणी विकत घेण्यावर बरेच पैसे आता खर्च करतो. नैसर्गिक संपदा आपल्या देशात मुबलक होती, आपल्या देशाला  मान्सूनचं वरदान आहे तरीही आपणच आपल्यावर ही परिस्थिती ओढवून घेतली आहे की साधं , पिण्याचं निर्मल पाणीही आपल्याला सहज मिळत नाही. 







Thursday, 8 November 2018

Water Water everywhere...



It was a pleasant summer evening in Bern, Switzerland. It was my first ever visit to Switzerland for a training course in the University of Bern. I was out for a stroll in areas near Bern Main station. just about 2-3 minutes walk from the Bern Main station, you come across a large space outside Visitors entrance of Swiss Parliament. I was pleasantly surprised to see water fountains spread in a rectangular shape and people enjoying a shower. From kids to elderly couples, everyone was enjoying water fountains. From there I entered corridors outside Parliament and came across yet another beautiful water fountain. I decided to have a sip, what a fresh and cool water it was. I was not aware at that moment, that I would have many such experiences in my two weeks stay in Switzerland. 

I visited two main cities, Bern and Zurich and saw many water fountains. on the very first day, I had realized that I don't need to carry filled water bottle as I carry in India. I just need to carry an empty bottle and fill it as and when needed. In the University, I happened to see a water fountain which had sensors. as and when we climbed stairs and reached a particular distance from the fountain, water started flowing. 

The city of Bern is well known for its 6 kms long shopping promenade. Be it any season, shopping in these promenade is a pleasure as they are well covered and provide protection from sunlight,rains and even snow.  At the center of one of the roads in shopping promenade is a water fountain which is unique and draws our attention immediately.  It has a statue of ogre who is seen eating a child. I was told that this fountain dates back to medieval times. Various theories have been put forward to explain this ogre statue. Historians may debate over these theories, but as one local guide pointed it to us, the statue for a long time has been used to instill some fear in the minds of children. Imagine a child throwing tantrums on the streets of market and parents embarrassed and trying to manage the child. They have this ready made Ogre statue to get the child under control. Lolz! 


These water fountains are epitomes of medieval history of Bern and Zurich. They dont just provide a fresh spring water, they provide a place to gather and chat and share pieces of gossip. Every time I  approached any of these fountains,  I could imagine a group of youngsters strolling on the streets of Bern and taking a break for water and then getting down to talks and gossips. So much of informal history these fountains must have witnessed for hundreds of years. 



some of the water fountains, in areas close to City of Bern have a strong agricultural impact on them. I observed some wooden water fountains near the fields. They remind us of how agriculture impacted lives of our ancestors. Big logs of wood add to the beauty of these fountains. Water fountains in Switzerland depict many historical and mythological figures, motifs. 

All water fountains spread across the streets of Bern and Zurich, added a tinge of freshness to my stay in these cities. For a person from a developing country such fresh water was indeed a pleasant surprise.  In my own country, clean and safe drinking water has become a challenge. Many of us are spending lot of money on buying water. A country like India, endowed with lots of natural resources has reached levels where drinking water is a challenge. As I breath fresh air of Zurich and enjoy fresh spring water, I travel back to India and wonder whether we are paying the price for irresponsible and unplanned development in our Country. 








Thursday, 11 October 2018

Zimply Malayali....Mahabelly....

Indians are passionate about food. Indians who have moved away from their homeland to other lands, are always very emotional about their food. In a diverse Country like India, moving away from homeland could simply mean, shifting from South India to North India or from East India to West India. This limited relocation can also make them very emotional about food from their place! May sound strange for globe trotters but thats how Indians are, passionate about food. I also had my share of relocation recently. I shifted from the financial capital of India to the political capital of India. From city that never sleeps, Mumbai  to Dilwalon ki Matawali Delhi. And those who have gone through this can sympathize with me absolutely. 
In a city like Delhi which has dominance of certain food culture, starting a hotel dedicated to Malayali or Kerala cuisine requires guts! And few young boys have shown these guts. I went to Mahabelly restaurant near DLF and City Walk Mall in Saket in 2015 for the first time. It sounded like an enthusiastic endeavour of young boys. Those were the times when start ups were booming in our Country. I again went to it recently and am really impressed by the unique blend Mahabelly offers.  Not just in terms of cuisine served here but also the ambiance of the place, the courteous staff and relentless efforts of its young and bright owners. 
 

If you go on special days like Onam , you get a feast on traditional plankton leaf. You indeed need Mahabelly to relish varieties of vegetables, salads,chutneys, pickles,curries , ghee laden rice served in this feast. What I find interesting is, when these varieties are being served, staff tells you their original names. you hear them and also try to remember them, but you would soon forget them as the awesome taste of food takes charge of you. Imagine, if you have to ask for a second helping of a particular item!lolz! you would simply struggle for exact name of the item, but staff here is expert and they would serve you exactly what you want. The kind of courteousness you experience here is otherwise rare in this city. ( I am sure people who belong to this city would not agree with me but my types would agree with me).
The site of colourful vegetables, pickles,salads served on fresh plankton leaves is appetizing enough. In this meal, you are served a kind of brown rice which is cooked soft enough for a comfortable eating. But if you are not from Southern India, you may not be comfortable with this rice. In that case, you can order a customized rice which is commonly served in other restaurants. But my take on this is bit different, If you are in a hotel dedicated to a particular cuisine, might as well enjoy it completely. When in Roman do as Romans do, when in Mahabelly, eat as Malayalis. What impresses me about this place is not just food but the ambiance. This place is a combination of traditional and contemporary stuff. So you find a large picture of kathakali dancer on the walls but the illumination of the place  is contemporary.

I am not Malayali.  I go to Mahabelly,  as a foodie,  as a die hard fan of South Indian cuisine. Mahabelly has other veteran competitors in the National Capital when it comes to serving South Indian food but Mahabelly has niche of Malayali/Kerala cuisine. And at the end of the day, like any other business, India has large enough market to accommodate all players. Enjoy your share of Kerala Cuisine.



Friday, 24 August 2018

आर .......



मला अलीकडेच स्वित्झर्लंडला जाण्याची संधी मिळाली होती. एका ट्रेनिंगसाठी मी युनिव्हर्सिटी ऑफ बर्न मध्ये १५ दिवस होते. भारतातून युरोपला किंवा स्वित्झर्लंडला ज्या सहली जातात त्यात बर्न हे शहर बहुतेक वेळा नसतं. पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठिकाणं म्हणजे झुरिक, जिनिव्हा , उंग फ्राऊ . त्यामुळे सर्वसामान्य पर्यटक बर्न शहरात फारसे दिसले नाहीत . बर्न ही या छोट्याशा देशाची राजकीय राजधानी. बर्न युनिव्हर्सिटीसुद्धा प्रसिद्ध . त्यामुळे इथे जगभरातून आलेले विद्यार्थी खूप दिसतात आणि नोकरदार वर्गही खूप दिसला .
आमची लेक्चर्स युनिव्हर्सिटी परिसरात होती आणि युनिव्हर्सिटी अगदी शहराच्या मध्यभागी आहे असं म्हणायला हरकत नाही. बर्न मेन रेल्वे स्टेशनमधून लिफ्टने ४ लेव्हल चढलं की युनिव्हर्सिटी. या रेल्वे स्टेशनपासून ५ मिनिटांच्या अंतरावर स्वित्झर्लंडच पार्लमेंट. आमची राहण्याची व्यवस्था मात्र उपनगरामध्ये होती असं म्हणता येईल. २० मिनिटांचा ट्रामचा प्रवास किंवा ट्रेनचा ७-८ मिनिटांचा प्रवास करून आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये पोचू शकत होतो. या रोजच्या प्रवासामुळे स्वित्झर्लण्डच एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आम्हाला अनुभवता आलं ते म्हणजे इथली प्रभावी सार्वजनिक प्रवास व्यवस्था. इथे बस आणि ट्रॅम एकाच प्रकारच्या ट्रॅकवरून जाताना दिसतात. इथल्या ट्रेनही अतिशय वेगवान आणि आरामदायी आहेत . वेळेच्या बाबतीत तर एकदम अचूक. डिजिटल इंडिकेटरवर जी वेळ दाखवलेली असते त्यावेळेला बस , ट्रॅम किंवा ट्रेन आली नाही असं आम्ही १५ दिवसात एकदाही अनुभवलं नाही. बस आणि ट्रॅम एकाच ट्रॅकवरून जाऊ शकत असल्यामुळे त्यांचे स्टॉप सुद्धा कॉमन असतात. अशा कॉमन स्टॉपवरच्या इंडिकेटरवर बस आहे की ट्रॅम आहे ह्याचं चित्रच दाखवलेलं असतं इतर तपशीलांबरोबर. या स्टॉप वर नकाशा असतो ट्रेनचं किंवा बसचं जाळं दाखवणारा. व्हेंडिंग मशीन असतं ज्यावरून पास रिचार्ज करता येतो. युरोपातल्या इतर देशांप्रमाणेच स्वित्झर्लंडची लोकसंख्या मर्यादित आहे त्यामुळे इथे अनेक गोष्टी ऑटोमेटेड आहेत. मशीनच्या आधारे अनेक गोष्टी करता येतात. कदाचित वापर मर्यादित आहे म्हणून इथली सगळी मशीन व्यवस्थित चालताना दिसतात.


बर्न शहर अशा सुविधांनी सज्ज असलं तरी या शहराचा प्राण आहे इथून शतकानुशतकं वाहणारी आर नदी. स्वित्झर्लंडमधली ही एक महत्वाची नदी आहे . पण बर्न शहरासाठी आर नदी म्हणजे पुणेकरांसाठी शनिवारवाडा किंवा अगदी वैशाली आणि रुपाली . बर्न शहरातले सगळे रस्ते जणू नदीकडे जात असतात. या शहराचं या नदीवरच प्रेम आपल्याला सतत जाणवत राहातं . या नदीचा आनंद इथले लोक कसा घेत असतात हे याची देही याची डोळा पाहिलं पाहिजे. हिवाळ्यात नदी गोठल्यासारखीच असते . या नदीचा खरा उपभोग इथल्या उन्हाळ्यातच घेता येतो. आपल्याकडे जशी नद्यांची दयनीय अवस्था आहे तसं दुर्भाग्य इथल्या कुठच्याच  नदीचं नाही . आर नदीचं पाणी स्वच्छ इतकं आहे की अनेक ठिकाणी नदीचा उथळ तळ सहज दिसतो. स्वित्झर्लंड हा डोंगराळ देश आहे त्यामुळे आर नदीसुद्धा दऱ्या  डोंगरातून वहाते त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला चांगला वेग आहे. आणि म्हणूनच इथे पोहण्याचा आनंदही आव्हानात्मक आहे. उन्हाळ्यात इथे आबाळ वृद्ध पोहताना दिसतात . नदीवर बर्न शहरातच म्हणे १८ पूल आहेत छोटे मोठे . इथल्या काही छोट्या पुलांवरच्या खांबांवरून सरळ नदीत उड्या टाकणारे शौकीनही खूप दिसले आम्हाला. रोज संध्याकाळी लेक्चर्स संपल्यावर नदीच्या वेगवेगळ्या काठांवर जायचं हा आमचा ठरलेला कार्यक्रम. एकदा फारशी वर्दळ नसणाऱ्या नदी काठावर आम्ही गप्पा मारत बसलो होतो. एक तरुण जोडपं आलं आणि आम्हाला म्हणालं , आम्ही नदीत पोहून येतोय १५-२० मिनिटात , तुम्ही आमच्या सामानावर लक्ष ठेवाल का? आम्ही अर्थातच हो म्हणालो, ही मंडळी जेव्हा परतली तेव्हा आम्ही गप्पा मारल्या, मी सहज त्यांना विचारलं तुम्ही बर्नचेच का? त्या तरुणाने मला पटकन सांगितलं मी बर्नचा आहे पण माझी मैत्रीण झुरिकवरून आली आहे, तिच्याबरोबर इथे आर नदीत पोहोण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा आज पूर्ण झाली. मला ऐकून गम्मतच वाटली, या नदीत एकत्र पोहोणे हा इथल्या लोकांच्या रोमँटिसिझमचा भाग होता . ज्यांना पोहायचं नाही त्यांच्यासाठी राफ्टिंगची सुविधा आहे. अगदी पाण्यावर तरंगत राहणारे मोठे फ्लोट किंवा तराफे आहेत. अनेक सुंदऱ्या या तराफ्यांवर आरामात पहुडल्या आहेत आणि त्यांचे मित्र तो तराफा वल्हवत आहेत असं हिंदी चित्रपटांमध्ये शोभेल असं दृश्य रोजच एकदा तरी पाहायला मिळत होतं .  नदीच्या काठावर अनेक ठिकाणी बायका, पुरुष कुठचाही संकोच न बाळगता पोहोण्याचे तोकडे कपडे घालून वावरत असतात. बायकांचे असे जेमतेम कपडे आहेत म्हणून कोणी त्यांच्याकडे डोळे फाडून बघताना मला दिसलं नाही . नदीच्याच काठावर आरामात कपडे बदलायचे. ते एका फ्लोटसारख्या पिशवीत भरायचे आणि त्या पिशवी कम फ्लोट बरोबर पोहत निघायचं दुसऱ्या किनाऱ्याला. तिथे पोचल्यावर आपले कपडे आपल्या त्या फ्लोट पिशवीत असतातच. अशा पिशव्या इथे सर्व दुकानांमधून सर्रास मिळतात. त्यावरून हेही लक्षात येतं की नदीत पोहणं ही इथली रोजची आणि अनेक लोकांची एक्टिव्हीटी आहे. 
.



नदीच्या काठाकाठाने चालत जाता येईल बरंच अंतर किंवा सायकल चालवत जाता येईल असे छान रस्ते नदीच्या काठावर बांधलेले आहेत. नदीच्या काठावर ठिकठिकाणी रेस्टोरंन्टस आहेत जिथे बसून नदीचा आनंद घेत खाता पिता येतं. एकदा अशा रस्त्यावर आम्ही रमत गमत चालतो होतो आणि अचानक लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. आवाज कुठच्या दिशेने येतोय काही संकटाची परिस्थिती असावी का याचा आम्ही अंदाज घेतोय तोवर काठावरच्या एका बाजूच्या छोट्या पायऱयांवरून एक तिशीच्या आसपासची बाई हसत वर चढताना दिसली, तिच्या हातात एक छोट्या मुलाचा चपलांचा जोडही होता. त्या बाईचा चेहेरा हसरा होता म्हणून नाहीतर तिच्या हातातला चपलांचा जोड आणि मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून मला तर धस्संच झालं होतं क्षणभर. मग तिनेच हसून मला सांगितलं, तिकडे मागे माझ्या मुलाच्या पायातली चप्पल नदीच्या पाण्यात पाय बुडवताना पायातून निसटली. ती त्याची आवडती चप्पल होती म्हणून मी धावत पुढे आले ती  चप्पल घ्यायला. 
बर्न शहर म्हणजे पूर्णतः आर नदीमय असणारं शहर आहे. इथल्या प्रत्येक माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय , मनातला हळवा कोपरा म्हणजे ही नदी. या नदीवर इथली मंडळी जेवढं प्रेम करतात तेवढीच तिची काळजीही घेतात. नदीतल्या पाण्यात चुकूनही कोणीही कुठचाही कचरा टाकताना दिसत नाही. नदीच्या काठावरून जाणाऱ्या रस्त्यांवर जागोजागी कचरा टाकण्यासाठी डबे आहेत आणि सगळे लोक त्यातच कचरा टाकतात. 
आपल्या देशाला खूप मोठा इतिहास आहे. आपली जगप्रसिद्ध सिंधू संस्कृती ही सिंधू नदीच्या आधाराने वसलेली होती. गंगा,ब्रह्मपुत्रा, नर्मदा, गोदावरी,यमुना , तापी , कावेरी अशा नद्या आणि सप्त सिंधूंची देणगी निसर्गाने आपल्याला दिली होती. आर नदीकडे पहाताना या सगळ्या नद्यांची सध्याची अवस्था आठवून कसंतरीच वाटायचं आपल्याकडे  तर नद्यांना धार्मिक महत्वही आहे तरी आपल्याला आपल्या नद्या स्वच्छ आणि सुंदर ठेवता आलेल्या नाहीत. स्वित्झर्लंडमधल्या नदीचं कौतुक करतानाच आपल्या नद्यांची आठवण येऊन वाईटही वाटत होतं आणि अपराधीही. विकासाच्या रेट्यात आपण काय गमावतो आहोत हे आर नदीकडे टाकलेल्या एका नजरेतून सलत राहिलं . 

















Thursday, 17 May 2018

परांठेंवाली गली





 दिल्लीतला चांदनी ( मराठीत चांदणी म्हटलं जात असलं तरी पुण्यातला चांदणी चौक आणि दिल्लीतला चांदनी  चौक यांची तुलना होऊ शकत नाही बरं ) चौक प्रसिद्धच आहे. गेल्या काही वर्षात इंटरनेट सगळ्यांना इतक्या सहज मिळालेलं आहे की त्याचा परिणाम म्हणून सगळेच जण सगळ्याच गोष्टी एकमेकांशी, जगाशी शेअर करायला लागले आहेत. मी पण अशाच प्रकारे चांदनी चौकातल्या परांठेंवाली गलीबद्दल वाचलं होतं, पाहिलं होतं. त्यामुळे दिल्लीला मुक्काम हलल्यावर  इथे जाणं माझ्या विशलिस्टवर अर्थातच होतं. दिल्लीतल्या करपवून टाकणाऱ्या उन्हाळ्यात इथे पाऊल टाकण्याचं धाडस मी केलं. पण त्याचा मला बिलकुल पश्चात्ताप झाला नाही. कितीही कष्ट करून इथे पोहोचावं लागलं तरी खवय्या लोकांनी ही गली चुकवू नये. दिल्ली मेट्रोच्या कृपेने तुम्ही चांदनी चौक ह्या मेट्रो स्टेशनवर उतरायचं आणि स्टेशन मधून बाहेर पडण्यापूर्वीच आपल्याला बोर्ड दिसेल ज्यावरून स्टेशनच्या कुठच्या बाजूला बाहेर पडायचं हे पण कळेल. मेट्रोच्या थंड,चकचकीत वातावरणातून बाहेर आलात की चांदनी  चौकातली Method In  Madness तुमच्यासमोर वहात असते. स्टेशनपासून ५ ते १० मिनिटात चालत तुम्ही परांठेंवाली गलीपर्यंत पोचू शकता. तिथे पोचेपर्यंत तुम्हाला रस्त्यावरून आडव्या तिडव्या धावणाऱ्या गाड्या, इ रिक्षा (म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा) , ओझी घेऊन पळणाऱ्या हातगाडया , डोक्यावरून ओझी वाहणारे मजूर,खरेदीला आलेली माणसं , जवळच्या गुरूदवाराला भेट देणारी भक्त मंडळी आणि आपल्यासारखी टूरिस्ट मंडळी यांचा सगळ्यांचा सामना करत परांठेंवाली गलीपर्यंत पोचावं लागतं .


कुठच्याही मोठ्या शहराच्या जुन्या भागात असतात तसा हा अरुंद, मॉडर्न स्टँडर्ड्सनी अस्वच्छ असा रस्ता आहे. इथे भटक्या कुत्र्यान्पासुन ते परांठेंवाली गलीचा अनुभव घ्यायला आलेले परीटघडीचे लोक सगळेच सुखाने आणि समाधानाने फिरत असतात. इथली काही दुकानं ही ५-६ पिढयांपासून चालत आलेली आहेत. आता सोशल मीडियामुळे या गलीला नव्याने ग्लॅमर मिळालेलं असलं तरी ही गली कुठचाही देखावा करण्याच्या फंदात अजूनही पडलेली नाही. बदलत्या काळानुसार इथे टिश्यू पेपर हात पुसायला मिळतात किंवा बाटलीबंद प्यायचं पाणीसुद्धा मिळतं पण प्लास्टिकचे हातमोजे घालून इथे पराठे लाटले जात नाहीत. इथले  पदार्थ  स्लिंग लावून झाकलेले  वगैरे नसतात. पराठा तुमच्या ताटलीत कृत्रिम अदबीने वाढला जात नाही.  आपण पराठा खायला जातो आदरातिथ्य अनुभवायला नाही. 

मराठी लोकांना पराठा तसा कमीच माहिती. क्वचित आपल्या घरांमधून मेथीचे, पालकाचे,बटाट्याचे पराठे होतात आजकाल पण ते मेथीची पोळी किंवा पालकाची पोळी म्हणावे असे असतात. पराठा शब्दातला दमदारपणा अनुभवायचा असेल तर परांठेंवाली गली गाठली पाहिजे. इथे भेंडीच्या पराठ्यापासून ते सुक्या मेव्याच्या पराठ्यापर्यंत अनेक प्रकारचे पराठे मिळतात. भेंडी या पुचाट भाजीच्या चाहत्यांनी लक्षात ठेवा की भेंडीला इथे ओक्रा म्हणतात . आता हा शब्द वाचून कोणाला मळमळल असेल तर इतर अनेक इंटरेस्टिंग पराठयांवर  लक्ष केंद्रित करा. डाळ पराठा , मिक्स भाज्यांचा पराठा , पुदिना पराठा, बटाटा पराठा, टोमॅटो पराठा, सुका मेवा पराठा अशी बरीच व्हरायटी इथे मिळते . खुर्चन असाही एक वेगळा शब्द तुम्हाला मेनू वर वाचायला मिळेल . हा पराठा मलाई किंवा साय घालून केलेला असतो. ह्या पराठयांचा आकार आणि जाडी दोन्ही पांढरपेशा जिभेला आणि पोटाला झेपेल असा असतो. त्यामुळे जर तुम्ही ग्रूपमध्ये गेलात तर बऱ्याच प्रकारचे पराठे मागवू शकता आणि प्रत्येकाला प्रत्येक पराठ्याची चव बघता येऊ शकते. इथले पराठे  भाजलेले नसतात . ते छोट्याशा कढईत तळले जातात खरपूस होईपर्यंत . तळण्याची कला जबरदस्त आहे इथली. पराठा समोर येतो तेव्हा तेलकटपणाचा मागमूसही नसतो. त्याच्यामागचं विज्ञान मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. इथे पराठे तळण्यासाठी वापरतात ती नेहेमीसारखी खोल कढई नाही . पण भाजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तव्यांसारखी उथळ पण नाही . तळल्यामुळे पराठ्याचा वरचा भाग खरपूस होतो आणि पराठ्याचा आतला भाग वाफेवर शिजतो. हे तवे कम कढई जाड बुडाची असल्यामुळे पराठा जास्त तेल खात नाही.






पराठा टेबलावर अवतरण्यापूर्वी त्याचे सगळे साथीदार एकत्रच तुमच्या भेटीला येतात. प्रत्येक दुकानांनुसार पराठयांचे साथीदार थोडेफार बदलतात. पण आंबट गोड चिंचेची चटणी , हिरव्या मिरचीची झणझणीत चटणी , बटाटा हा प्राण असणारी आणि नावापुरते मटार टोमॅटो असणारी रसभाजी येतेच पराठ्याबरोबर चाखण्यासाठी . मला तर आपल्या लाल भोपळ्याची झणझणीत भाजी पण खायला मिळाली . लाल भोपळा सुद्धा इतका चटकदार होऊ शकतो हे मला नव्यानेच कळलं इथे.माझ्या ताटात आलेल्या चिंचेच्या आंबट गोड चटणीत एक पिवळसर तुकडा तरंगत होता. आधी मला तो अमूल बटरचा तुकडा आहे असंच वाटलं पण चमच्याने आणि जिभेने थोडं अधिक संशोधन केल्यावर कळलं की ते साधारण पिकलेल्या केळ्याचे तुकडे आहेत. 

 परांठेंवाली गल्लीतल्या एका दुकानात बसून पराठ्याचा तुकडा मोडताना मला दिसत असतात गल्लीत सगळीकडे वर एकमेकात गुंतलेल्या विजेच्या तारा, एका बिल्डिंगवरून दुसऱ्या बिल्डिंगवर सहज उड्या  मारणारी एक दोन माकडं, रस्त्यावर पहुडलेले- भटकणारे कुत्रे , कामगारांची लगबग. या सगळ्याकडे तटस्थपणे मी पाहात असताना माझया १२ वर्षांच्या,  कायम शहरात वाढलेल्या मुलीचं वाक्य माझ्या कानावर आदळत , काय ह्या हॉटेलची साफसफाई सुद्धा होत नाही का रोज? थोडं रिनोव्हेशन करायला पाहिजे यांनी , किती अस्वच्छ आहे सगळं. मला अचानकच जाणवलं की ही परांठेंवाली गली एका वेगळ्या काळातली आहे. माझ्या पिढीला कदाचित त्या काळाशी अजूनही जुळवून घेता येतंय पण माझ्या मुलीच्या पिढीला बिलकुलच नाही. तिच्यासाठी या देशी चवीपेक्षा आणि देशी अनुभवापेक्षा स्वच्छ,नीटनेटकं, मॉडर्न असं जग रेलेव्हन्ट आहे. ती  कदाचित आपल्या आईवडिलांची इछा आहे म्हणून इथे आली असेल पण मनातल्या मनात कधी एकदा इथून निघतो आणि एखाद्या वातानुकूलित टापटीप हॉटेलात जातो अस वाटत असेल तिला .  उत्साही आणि हटके असे पर्यटक इथे येत असतील पण त्यांची संख्या किती असेल? इथला बिझनेस चालू ठेवण्याइतकी असेल का? या परांठेंवाली गलीने आपलं सध्याचं रूप बदलायचं म्हटलं तर ते आर्थिकदृष्ट्या त्यांना शक्य आहे का? बहुदा नाही. आणि त्यातूनही समजा त्यांनी हे रूप बदललं तर इथल्या पराठ्याना आज जे देशी अपील आहे ते तसंच राहील का? अत्ता या पराठ्याना जी साधी आणि अकृत्रिम चव आहे ती  तशीच राहील का? इथे माझ्यासारखे परीटघडीचे लोक पराठे खायला येतात तेव्हा त्यांच्या मनाला एक सैलपणा येतो तो त्या टापटीप हॉटेलात पराठा खाताना येईल का? याही सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही अशीच आहेत . काळाच्या रेट्यात परांठेंवाली गली कात टाकते आणि नवीन रूप धारण करते की लुप्त होऊन जाते ह्याचं उत्तर आज कोणाकडेच नाही. 


Wednesday, 16 May 2018

Ban Maska,Chai,...Experience kayani....

Mumbai is known for its cosmopolitan culture. Its a city which has welcomed people from all over the globe. Some of these immigrants have left interesting impressions on the architecture,culture and culinary heritage of the city. A quiet but a definite impression on Mumbai has been of Zorastrian Iranis. Mumbai boasts of Irani cafes and also some restaurants which give us a taste of Zorastrian cuisine. Irani cafes flourished in Mumbai when it was metamorphosing itself into an important city in the Country. Mumbai had just started attracting crowds from all over the country in search of employment. It was becoming a city of dreams,a city of hopes,city of opportunities. It was having a large working class. Probably to cater to the needs of people who had left their homes and families behind, Irani cafes and Mumbai special Udipi restaurants came up in Mumbai.  Many Irani Cafes were established in the early 20th century. It is interesting to see that a thread of continuity flows through these Irani cafes even now.  
Kayani and Co. is one of the oldest Iranian Cafe in Mumbai. Lot many writers,bloggers,travelers have written about it.  I am neither a writer nor a traveler. But just like many others, I am tempted to write about "Experience kayani" .  kayani and Co. is strategically located, bang opposite Metro theater.  In the usual glam of Mumbai eateries, kayani stands out for its simplicity and even its kinda lackluster appearance. Not everybody would prefer to go to kayani. Foodies from all over the world, would certainly be interested in visiting kayani for its long tradition and culinary specialties. The moment you enter kayani, you encounter an old style furniture, walls full of photo frames,posters and many straightforward instructions to customers! Old teak-wood furniture draws your attention and you wouldnt miss checkered  table cloth on all tables. Moment you are seated on one of the tall back chair, you would notice a menu card inserted above the table cloth and below the glass placed as table top. Convenience! Menu cards dont have to be circulated from table to table. They are there on all tables, safe and easily visible. 
 Bun Maska and Irani style Chai is USP of Kayani. But dont make a mistake of sticking only to Bun Maska. Kayani has lot many experience on offer for you. and they are all worth experiencing. Bun maska here is a kind of what we call now, "bread butter". But, bread is nowhere close to soft and fluffy bun that you get in Kayani. Our taste for butter is whats developed by "Amul" But before Amul took charge of our tastes, many bakeries in Mumbai offered, Maska. It used to be a bar which is neither too hard nor too soft, slightly yellowish in colour,  wrapped in butter paper. Bun Maska in Kayani has maska which is not as salty as butters that we get all over. Quantity of Maska applied to bun is just right.  Bun Maska and Irani Chai is 'Must have" in Kayani. But, I am a coffee person and not Chai person. kayani did not disappoint me. Coffee that came in old style white cup was neither too milky nor too sweet. And bun maska tasted equally delicious with Coffee.  For non vegetarians, Kheema Pav is certainly a feast. Mava cakes, all kinds of pastries are available here to satisfy sweet tooth. 
Road outside Kayani is one way now, full of traffic. Buses moving ahead, cars and taxis paving way , people hustling and bustling to cross the road. I wonder how many such days and months and years must have been witnessed by kayani. It must have seen wide roads of South Mumbai. So has it seen Mumbai growing from a small business city to a Metropolitan city and now a Megapolis. It has seen Iconic Metro theater converting itself to Multiplex. Kayani is also one of the oldest surviving Irani cafes in India. It represents Zorastrian culture which is a quintessential part of Mumbai culture but now on the verge of extinction.  Kayani has satisfied hunger pangs of large working class of this city at affordable price. This Irani cafe doesnt have a hurry of Udupi restaurants of Mumbai. kayani even now is a laid back place. Nobody seems in a hurry here. You can enjoy just a cup of chai here for half an hour without uneasy glances by the staff. Kayani offers tasty food at reasonable price. It is not greedy about attracting crowds. Kayani is what it was when it was established. With changing times, few things may have changed but Soul of kayani continues to be what it has been.  On one end I see a quiet,simple Cafe which has been there for over a century.On the other end, I see busy road of South Mumbai where everybody seems to be running for something. As I relish my Bun Maska, looking at the street, an inevitable sadness grips me,  Chaos outside will soon overpower this simplicity!




Monday, 5 March 2018

बन मस्का, मावा केक,इराणी चाय....


दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या जवळ मेट्रो हे प्रसिद्ध थिएटर आहे. या मेट्रोच्या चौकात मेट्रोच्या समोरच्या बाजूला कयानी हे इराणी हॉटेल आहे. या चौकातल्या धो वाहणाऱ्या वर्दळीमध्ये चटकन लक्षातही येणार नाही असं हे हॉटेल आहे. बाकीच्या हॉटेल किंवा मॉलसारखी या हॉटेलला चमक धमक नाही. शंभराहून अधिक वर्ष टिकून असलेल्या आणि तो जुनेपणा मिरवणाऱ्या इमारतीत हे हॉटेल आहे. त्यामुळे बाहेरून छान वाटलं म्हणून शिरलो किंवा बाहेर ताटकळणारी तुफान गर्दी पाहून घुसलो असं हे हॉटेल बिलकुल नाही. इथे येणारा माणूस हा दर्दी असणार हे नक्की. वर्षानुवर्षं मुंबईच्या खाद्येतिहासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या इराणी हॉटेलपैकी हे एक हॉटेल आहे. मुंबईतली अत्यंत सोयीची उडप्याची हॉटेलं येण्यापूर्वीपासून ही इराणी हॉटेलं मुंबईत आहेत. पारशी समाजाचं जसं मुंबईच्या इतिहासात ठाशीव योगदान आहे पण त्याचं प्रदर्शन नाहीये तशीच ही इराणी हॉटेलं आहेत. वर्षानुवर्षे ही हॉटेल आपली वेगळी खाद्यसंस्कृती जपून आहेत , काळाच्या आघातांपुढे यांनी झुकायला नकार दिलेला आहे आणि प्रदर्शन करण्याचा मोह यांना कधी पडलेलाच नाहीये. 

मुंबईत आता मोजकीच इराणी हॉटेल्स उरली आहेत. या इराणी हॉटेलांपैकी कदाचित सर्वात जुनं आहे कयानी. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला हे इराणी कॅफे मुंबईत सुरु झाले. झोराष्ट्रीयन पारशी समाजातल्या मंडळींनी हे कॅफे सुरु केले. त्यामुळे इथल्या अनेक पदार्थांवर पर्शियन  उर्फ इराणी प्रभाव जाणवतो. कयानीमध्ये शिरल्यावर टाईम मशीनमध्ये बसून काही दशके मागे गेल्यासारखं वाटू शकतं. इथे सागवानी टेबलं , तशाच मजबूत खुर्च्या , टेबलांवर चौकडीचे टेबलक्लॉथ , भिंतींवर झरतुष्ट्राचे फोटो, जुनं ठोके देणारं घड्याळ, क्वचित उद्धट वाटू शकतील अशा स्पष्ट सूचना असा माहोल समोर येतो . अनेक वर्षं इथे साधी रंगरंगोटी सुद्धा झाली नसावी असं वाटतं. पण... बाह्यरूपाला जर तुम्ही बळी पडलात तर तुम्ही एका छान खाद्य अनुभवाला मुकाल. 

बन मस्का ही इथली खासियत आहे. आजकाल ज्याला आपण ब्रेड बटर म्हणतो त्या वर्गातला हा पदार्थ आहे असं म्हणता येईल. पण बनची सर ब्रेडला नाही आणि मस्का मारणे यातली गम्मत समजून घ्यायची असेल तर इथल्या मस्क्याची चव घेतलीच पाहिजे. बन हा गोल आकाराचा मऊ पाव असतो आणि हा मध्ये कापून त्यावर मस्का पसरवलेला असतो . पसरलेला असतो हा शब्दप्रयोग मी मुद्दामच केला आहे. मस्का लावलेला असतो असं जर मी म्हटलं तर त्यात यांत्रिकता वाटते. मस्का चोपडलेला असतो असं म्हटलं तर एकदम धसमुसळेपणा आठवेल. मस्का मारलेला असतो असं म्हटलं तर त्या बन मस्क्याच्या जिभेवर विरघळणाऱ्या आणि हृदयात शिरणाऱ्या चवीचा तुम्हाला बिलकुल अंदाज येणार नाही. पसरलेला असतो म्हटल्यावर तो मस्का बनवर कसा तब्येतीत विराजमान असतो याचा तुम्हाला थोडा अंदाज येईल. आता हे मस्का प्रकरण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्यापैकी बहुतेकांच्या जिभाना खारट चव असणाऱ्या अमूल किंवा तत्सम बटरची  सवय झालेली आहे. पूर्वी  बेकरयांमधून  बटर पेपरमध्ये गुंडाळून विकला जाणारा पिवळसर रंगाचा मस्का काहीजणांना आठवत असेल. तर तो मऊसूत मस्का या बनवर असतो. या मस्क्याचं त्या बनवरचं प्रमाण ही पण इथली खासियत म्हणायला हवी.. मस्क्याचा इतकाही मारा नसतो की बनची  चव कळूच नये. पण बन मस्का खाताना मस्क्याचा मऊसुतपणा आणि खास चव तुमच्या जिभेचा आणि हृदयाचा ठाव घेणार हे नक्की .  इथे बन मस्का हा इराणी चहाबरोबर खाल्ला जातो . पण मी चहाच्या पक्षातली बाई नाही. माझा पक्ष कॉफीचा आहे . पण म्हणून कयानीने मला सावत्र वागणूक अजिबात दिली नाही. नेमकी साखर आणि कॉफी पावडर असणारी कॉफी दरवळत आली आणि तिनेही चहासारखंच  बन मस्क्याला आपल्यात सामावून घेतलं . 

बन मस्क्यावर खूश होऊन बाकीच्या पदार्थांकडे लक्ष न देण्याची चूक खवय्यांनी करायची नाही . मांसाहारी मंडळींनी इथला खिमा पाव जरूर ट्राय करावा . एरवी तेलात तरंगणारा खिमा मिळतो तसा हा खिमा नाही . व्हेज पफही त्याचा खुसखुशीतपणा अनुभवण्यासाठी ट्राय केलाच पाहिजे. या मैफलीची भैरवी ही गोडानेच झाली पाहिजे . ज्यांना बन मस्का जड झाला असेल त्यांनी साधा मावा केक ट्राय करावा . ज्यांना कॅलरीजची कधीच चिंता पडत नाही त्यांनी ब्लॅकफॉरेस्ट किंवा चॉकोलेट पेस्ट्रीसारखे  दमदार पर्याय आपलेसे करावेत .  

कयानीमध्ये बसल्या बसल्या इथल्या भिंतींवरच्या सूचना फलकांकडे तुमचं लक्ष नक्की जाणार . डिजिटल इंडियाचा मोठा गाजावाजा बाहेर चालू असला तरी , " WE ACCEPT CASH  only " असा फलक इथे सुखाने नांदत असतो. बाहेरच्या जगात कितीही उलथापालथी गेल्या ७०-८० वर्षात झाल्या असल्या तरी त्याचं दडपण कयानीने घेतलेलं दिसत नाही. कयानी सुरु झालं तेव्हा हा मेट्रोचा चौक खूपच प्रशस्त वाटत असणार. त्यावेळी या चौकात बैलगाड्या, घोडागाड्या धावत असणार. मुंबई हे त्यावेळी जगाच्या नकाशावर उगवायला लागलेलं कष्टकरी लोकांचं शहर असणार . आजच्यासारखा अजस्रपणा त्यावेळी मुंबईत नसणार. कामानिमित्ताने मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ त्यावेळी नुकताच सुरु झालेला असणार . या कष्टकरी चाकरमान्यांची भूक कयानीने त्यांना परवडणाऱ्या किमतीत भागवली असणार . इराणी संस्कृतीचे बंध टिकवत कयानी इथे रुजली असणार . आज मुंबईच्या अक्राळविक्राळ अस्तित्वात पारशी समाज शांतपणे अजूनही वावरतो आहे . मुंबई नामक अजगराने पारशी समाजाचा साधेपणा गिळंकृत केलेला नाही . आपल्या साधेपणाची कयानीला लाजही वाटत नाही आणि खंतही वाटत नाही . किंवा त्या साधेपणाचं शोकेसिंगही कयानी करत नाही . कयानीत बसल्या बसल्या , बन मस्का जिभेवर विरघळत मनावर पसरत असताना एवढंच वाटत राहातं की इतिहासाशी आपल्याला जोडून ठेवणारा हा धागा किती काळ टिकणार ? 


Monday, 8 January 2018

Nurturing Marathon Culture...

Friends, probably the title of my post is confusing? You are not able to make out what I am going to write about? These days we do find social media flooded with runners's experiences, tips about running, dos and don'ts for running, practically everything about running is available all over. Then whats is it that I am gong to write? yeah, let me share my mind and heart with you all. Season of marathons is on! Though we have marathons throughout the year, winter is best time for marathons in cities like Mumbai. So on all Sundays we practically have at least one marathon. From metropolitan cities to smaller cities, all cities are coming up with marathons. Go to any city and you should find posters of some marathon coming up in the city or visual memories of marathon gone by.All these marathons get an enthusiastic participation. participation from professionals and amateurs. I am also one of those amateur runners. And since I am not professional runner, I don't worry about speed. My energies are concentrated more on observing things and people around me. It is interesting to see the enthusiasm and commitment of all runners,  expressions on their faces. 

But at the same time, there are many things which worry me, which disturb me.  long runs start early in the morning. Major part of long run is in darkness. Most of the routes are through arterial roads of cities. Considering darkness,conditions of roads, there is always a danger of a fall. And there are  runners with over enthusiasm who  may even push others in attempt to go ahead. This category of pushing others and trying to move ahead is more among amateurs than pros. I sometimes feel like stopping them and telling them, "hello, what for is this pushing? winner has already reached finish point, enjoy your run and let me enjoy mine" Some of the marathons are so crowded that I start wondering whether it is time for Government to step in and limit the number of marathons to be organized in a city. It is also time for Marathon organizers not to enroll more runners than the capacity. It is not just the crowded running route but also a big rush for collecting breakfast,medals. Most of us are tired and also excited after completing a run. So spirits run high even after the run. You may witness arguments over jumping of ques,frustration about crowd every where.  Roads leading to assembly area get choked up before  and after the marathon. Considering limited open spaces in most of our cities, gathering of huge crowds for marathons could be an invitation for mishaps. Some of you may feel that I am exaggerating. But we must remember, we are running for enjoyment, we are running as a part of healthy competition. It has to be a good experience and we all got to contribute to it.

Have we seen the marathon route, assembly area,medal collection,breakfast collection area after the marathon? Gosh, its full of overflowing bins, water bottles,tetra packs,signage boards strewn all over. Efficiency of event management company is crucial in managing all the litter created after marathons.  Have we ever given a thought to plastic water bottles that are used and thrown and the consequent damage to the environment? Have we ever thought about the disturbance caused in residential areas due to marathons? 
Arranging marathons is a profit making, publicity making,fund raising activity these days. Our huge population is enthusiastically participating in this . It is certainly a fun to run. A good run boosts one's morale, improves one's self esteem, builds a fitness culture. With a marathon culture a part of our social fabric now, it is time to be more sensitive,more responsible about marathons. Time to run with a concern for environment,concern for fellow citizens!

अनवट पर्यटन- दागशाई

  एखादा मोठा विकेंड असेल तर फिरायला जाता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं दिल्लीच्या जवळपास आहेत. शिमला,जयपूर,नैनिताल,मसुरी, ऋषिकेश,लॅन्सडाऊन हि  ...