Sunday, 24 December 2017

Two generations running in pinkathon...

17th December 2017.. 5am, Bandra Kurla Complex in Mumbai is buzzing with enthusiastic women runners.. me and my 12 year daughter among enthusiastic runners..this is my second Pinkathon but first Pinkathon for my daughter..
I have an experience of 10 k run but my cutie pie is running 10 k for the first time..my motherhood overpowers my reasoning capacity.. when I am helping her with warm up my instructions to her not ending..dont exert..drink water at regular intervals..if you feel tired dont stretch beyond limits..my daughter is too sweet to confront me and quietly but confidently listens to my instructions...
10 k run is flagged off by my all time crush- Milind Soman..me as well as my daughter start running. its little dark on the route. I am conscious of the fact that I am running after long break, am also worried about my 12 year daughter who would soon stride ahead of me making it difficult for me to keep watch on her. I try my best to keep my worries away and concentrate on my run.  
I manage to run 5 kms at my slow pace and at a turn I see my daughter running..ease at which she is running assures me..the moment I see her I suddenly feel lighter, my body picks up the pace which it had not picked so far. It makes me feel good to see that my daughter is enjoying her run, makes me feel proud of my bundle of joy which is now an independent runner, am glad that she is on the path of healthy lifestyle!
I suddenly realize that my last 5 kms run was marred by worries for my daughter. Even if my body was running at its pace, my mind was flying with my daughter. I ask myself, was it really necessary to worry so much about her? she is a smart child, she could have asked for help if she needed. She was enjoying her run. I should have left my worries and enjoyed my run as well. My run becomes more satisfying after this point. Am always happy to run in Pinkathon. It may not be a truly professional run but it is a run of women's never ending enthusiasm, it is a run of women's tenacity, run of women's strong spirits. I especially appreciate the objective of Pinkathon- spreading awareness about women's health related issues-especially breast cancer. We, women are known to be affectionate,caring, loving. But in the course of life, we kind of forget to take care of ourselves,  in our endeavor to care for all family members we start neglecting small and big things about our own health, we stop being kind to ourselves. My close family member has successfully fought a battle against cancer. Her fight against cancer continues to inspire me in all walks of life. When I run in Pinkathon I remember her gracious battle against the disease, many known and unknown battles against the disease give me a strength to run. My run truly binds my spirit to those fighting spirits. My run and other pink sisters running along with me remind me to be kind to myself. Remind me to devote some time to my well being. Remind me to start doing things which I truly enjoy. In Pinkathon 2017, a circle is complete which started with my aunt's battle against cancer, my wake up call and journey on the fitness path and my daughter's beginning on the fitness path.  

Wednesday, 6 December 2017

माझे मीपण ...




परतवत असते मी माझ्या मीपणावरचे हल्ले 

तव्यावरची भाकरी परतावी तशा सहजपणे 

लढत असते मी स्वत्वाची लढाई सततच 
घरात,घराबाहेर,ट्रेन, बस, रिक्षा,टॅक्सी सगळीकडे 

घेत असते मी टक्कर कधीच न संपणाऱ्या पुरुषी इगोशी 
सांभाळत असते माझे मीपण कसेबसे.... 

Friday, 29 September 2017

अनादी... अनंत... लडाख...


आजकाल आपण अनेकवेळा फिरायला कुठे कुठे जात असतो. देशात,परदेशात. जास्त पर्यटक जात नाहीत अशा अनवट ठिकाणी जाण्याचाही ट्रेंड आहेच. जम्मू काशमीरमधला लडाख परिसर मात्र खूप पर्यटक जात असले तरी अनवट असा आहे. इतर पर्यटनाच्या ठिकाणी जाणं आणि लडाखला जाणं यात फरक आहे. जे लडाखला जाऊन आले असतील ते माझ्याशी सहमत होतील. मनाला भुरळ घालणारं निसर्ग सौंदर्य भारतात कितीतरी ठिकाणी आहे. लडाखला सुद्धा निसर्गाचं वरदान आहे पण त्या पलीकडे इथे अस काही आहे की जे आपल्या मनाच्या तळापर्यंत पोचतं. इथले उंचउंच डोंगर, नद्यांची लांबरुंद  पात्रं, डोंगररांगातून सरसरणारे रस्ते, आकाशातून भुरभुरणारं बर्फ मनातले अनेक कोपरे ढवळून काढत असतात. महाराष्ट्रात राहिलेल्या मी सह्याद्रीसारखा जुना  पर्वत जवळून पाहिला आहे,अनुभवला आहे. हिमालयाची उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यातली वेगवेगळी रूपं पाहिली आहेत . पण लडाख परिसरातल्या हिमालयाच्या काराकोरम पर्वतरांगा वेगळीच जादू घेऊन वर्षानुवर्षे उभ्या आहेत. उत्क्रान्तीच्या प्रवासात हिमालय हा तुलनेने नवीन पर्वत आहे.  तो एकाच वेळी अवखळ आहे आणि  धीर गंभीरही आहे. त्याची ही दोन्ही टोकाची रूपं लडाखमध्ये अनुभवायला मिळतात.  डोंगरातून वाट काढत गाडी जात असते तेव्हा या अचाट आणि अवाढव्य डोंगराची भीती वाटते तशी त्यांची   भुरळही पडते . मनात येत राहातं शेकडो हजारो वर्षांपासून हे डोंगर इथे असतील. कशाकशाचे  साक्षीदार असतील. या डोंगरातून दूरवर जाणारे रस्ते बांधणाऱ्या माणसांच्या चिकाटीचे साक्षीदार असतील, इथल्या कठीण हवामानात  तग धरून राहाणाऱ्या माणसांच्या चिवटपणाचे साक्षीदार असतील. निसर्गाच्या वेगवेगळ्या कारामतींचे साक्षीदार असतील. हे डोंगर कापत वेगाने खळखळणाऱ्या नद्यांचे साक्षीदार असतील, या  नद्यांमुळे फुललेल्या जीवनाचे साक्षीदार असतील. या नद्यांना या डोंगरांनी सामावून घेतलं तसं माणसांनी बांधलेल्या रस्त्यांनाही घेतलंच  की सामावून . या डोंगररांगांवर नांदणारी शांतता पण बोलकी असते. शांतता बोलकी कशी असू शकते? असते.  शांतता बाकी सगळे कोलाहल संपवते. आपल्यालाच आपल्याशी बोलायला लावते. आपल्याला प्रश्न विचारते. आपल्या जगण्याविषयी आपल्या अस्तित्वाविषयी. एरवी न जाणवणारे बरेचसे आतले आवाज या शांततेच्या  निमित्ताने ऐकायला येऊ लागतात. आपण कोण आहोत, नक्की काय करतो आहोत, काय करू शकतो , काय करू शकलो असतो  असे  प्रश्न ही शांतता आपल्यापुढे सहज उभे करते. ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवतानाही हीच शांतता सोबत असतेच.





डोंगरांगातून रस्ता कापत पॅंगॉंग लेकला आपण जातो तेव्हा सगळ्या लडाख ट्रीपचा सर्वोच्च बिंदू आपण गाठतो. तुम्ही यापूर्वी कितीही निसर्गसौंदर्य पाहिलं असलं तरी याच्या दर्शनाने तुमची बोलती बंद होणार यात काही शंकाच नाही. ते निळंशार अस्तित्व तुम्हाला नक्की नम्र करणार. क्षणाक्षणाला बदलणारे त्याचे रंग आपल्याला आपल्याच मर्यादा जाणवून देतात. कितीही उत्तम कॅमेरा तुमच्याकडे असला तरी ही जादू पूर्णतः आपल्या कॅमेऱ्यात साठवता येत नाही. एका मर्यादेपलीकडे आपण त्या कॅमेऱ्याच्या तावडीत राहूच शकत नाही. मैलोन्मैल   पसरलेला तो लेक कसा आणि किती साठवावा मनात असं वाटत राहातं. त्या पाण्याने   कुठची कुठची आणि केव्हा केव्हाची   प्रतिबिंब साठवली असतील. किती वर्ष हे पाणी असं इथेच असेल. म्हटलं तर प्रवाही म्हटलं तर तिथल्यातिथेच . काय असेल आजुबाजुच्या डोंगराचं आणि या पाण्याचं नातं ? या डोंगरांचे पण किती अवतार या पाण्याने पाहिले असतील? या डोंगराची किती रूपं या पाण्याने दाखवली असतील? काय असेल या डोंगराचं या पाण्याचं प्रयोजन? माणसाला जिथे पोचणं कठीण आहे आणि राहणं तर त्याहून कठीण आहे अशा या ठिकाणी येण्याचा माणसाचा तरी अट्टाहास का? कुठची जादू माणसाला इथे  ओढून आणत आली आहे? माणसाचं आणि निसर्गाचं अनादी आणि अनंत असं हे नातं आहे का? त्या पाण्याचं ते विविधरंगी अस्तित्व आपल्याला काय सांगत असतं ? बदल आणि बदलांची अपरिहार्यता? मानवी आयुष्याची क्षणभंगुरता पण एकूणच अस्तित्वाची अनादि आणि अनंत अवस्था? लडाख आपल्याला प्रश्न विचारतो तसे त्याची उत्तरं शोधायला पण मदत करतो. काही गाठी इथे आल्यावर सुटतात पण काही नवीन गाठी इथे आल्यावर बसतातही. आणि या बसलेल्या गाठी  सोडवण्यासाठी पुन्हा इथेच यावंसं वाटत राहातं 
  




Wednesday, 13 September 2017

आप भी आ जाओ यही पे....


मी नुकतीच लडाख परिसरात ८ दिवस फिरून आले. यात काय विशेष असं एखाद्याला वाटू शकतं. विशेष काही नसलं तरी एक थोडीशी वेगळी गोष्ट अशी की मी आणि माझ्या मैत्रिणी गेलो होतो ८ दिवस फिरायला. आमचे कोणाचेही कुटुंबीय नव्हते आमच्या बरोबर. आणि आमची मुलंही काही वयाने फार मोठी नाहीत. म्हणजे त्यांच्या शाळा, अभ्यास अशा  जबाबदाऱ्या त्यांच्या वडील आणि आजी आजोबांवर सोपवून आम्ही गेलो. ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. जायचा प्लॅन तर मी जोशात केला. जसजसे जायचे दिवस जवळ यायला लागले तसा थोडा जीव वर खाली व्हायला लागला. मुली शाळेच्या बससाठी वेळेवर जातील  ना, योग्य दिवशी योग्य युनिफॉर्म घालतील ना, छोटी  मुलगी ८दिवस राहील का माझी आठवण ना काढता अशा अनेक चिंता मला सतावत होत्या. पण बरेच पैसे खर्च करून विमानाची तिकीट काढली होती, हॉटेलची बुकिंग झाली होती त्यामुळे मागे फिरणं शक्य नव्हत. माझ्या सार्वत्रिक चिंतेचा भाग म्हणून मी माझ्या ११ वर्षाच्या मुलीला म्हणाले, मी तुमचा ८ दिवसांचा मेनू लिहूनच ठेवू का? माझया मुलीचं उत्तर, " मम्मा, त्यापेक्षा तू जाऊच नकोस " अशा स्पष्ट उत्तराने मला अचानक बळ मिळालं ८ दिवस घरापासून लांब जाण्याचं. 

मुंबई दिल्ली आणि दिल्ली लेह असा विमान प्रवास. मुंबई दिल्ली विमान प्रवासाचं काही नावीन्य नव्हतंच. दिल्लीला लेहच्या विमानात   बसल्यावर १५ मिनिटातच बाहेर जे दृश्य दिसायला लागलं त्याने  संपूर्ण ट्रीपमध्ये जे काही अनुभव येणार होते त्याची झलकच मिळाली. सर्वसाधारणतः आपण विमानातून जातो तेव्हा सगळे डोंगर बरेच खाली आणि विमान अगदी उंचावर अशी परिस्थिती असते. इथे मात्र खिडकीतून जरा बाहेर डोकावल की हिमालयाच्या लांबच लांब रांगा दिसत राहातात.  आपल्याला भेटायलाच आल्या असाव्यात इतक्या जवळ. विमानाच्या लँडिंगची ज्यावेळी घोषणा होते तेव्हा तर मजाच येते. आता हे विमान कुठे आणि कस उतरणार असंच वाटायला लागतं. डोंगराच्या रांगा संपतच नसतात. कुठे सपाटी दिसतच नसते. अचानक आपलं विमान एका डोंगराला ओलांडत आणि एकदम लेहचा डोंगर रांगांनी वेढलेला परिसर दिसायला लागतो. 

लडाख परिसर पर्यटकांच्या रडारवर येण्याचं मुख्य कारण म्हणजे आमीर खानचा प्रसिद्ध चित्रपट थ्री इडियट्स. या चित्रपटात आपण फुंगसूक वांगडूची निसर्गरम्य परिसरातली आगळी वेगळी शाळा बघितली. पेंगोंग लेकच्या काठावर स्कुटरवरून येऊन आमीर खानच्या गळ्यात पडलेली करीना कपूर बघितली. त्यामुळे गेल्या काही वर्षात खूप पर्यटक इथे यायला लागले आहेत.  मी पण  त्यातलीच एक  पर्यटक.   लडाखवर निसर्गाचा  वरदहस्त आहे.  जिथे नजर जाईल तिथे पर्वतांच्या रांगाच रांगा पसरलेल्या दिसतात. काहींवर बर्फ, काही रिकामेच. आकाशाचा निळा रंग म्हणजे भुलवणारा निळा. चित्रांमधून असतात तशा नेमक्या छटा. प्रत्येक क्षणाला बदलणारे पॅंगॉन्ग लेकचे रंग तर थोड्याच वेळात आपल्याला आपला कॅमेरा बाजूला ठेवायला भाग पाडतात. ही निसर्गाची किमया आपण कितीही प्रयत्न केला तरी पूर्णपणे एखाद्या माध्यमात साठवून ठेवू शकत नाही , ती याची देही याची डोळा बघितली पाहिजे, अनुभवली पाहिजे. 

इथलं आयुष्य सोपं नाही. आपण कधीतरी फिरायला म्हणून जातो तर आपल्याला इथली थंडी हवीहवीशी वाटते. पण वर्षाचे सहा महिने जबरदस्त गोठवणारी थंडी , बर्फामुळे रस्ते बंद पडतात, वीज नसते, अन्नधान्य भाजीपाला मिळत नाही. प्यायच्या स्वच्छ पाण्यापासून ते विजेपर्यंत सर्वच गोष्टी कठीण होतात . अशाही परिस्थितीत इथली माणसं एकमेकांना धरून जगत राहातात, तगत रहातात, लढत रहातात. लडाखमधल्या अगदी छोट्याशा गावात जरी तुम्ही गेलात तरी समोरून येणारा माणूस विशेषतः बायका अगदी हसून तुम्हाला , "जुले " म्हणणार. जुले म्हणजे लडाखी भाषेतले नमस्ते. लडाख मधल्या सगळ्या बायका मला फार कामसू आणि तरीही प्रसन्न दिसल्या. सकाळी लवकर जवळच्या  गावातून ताज्या भाज्या, फळं घेऊन येणाऱ्या बायका असू देत,  लेहच्या स्थानिक मार्केटमध्ये गरमागरम मोमोज किंवा लडाख स्पेशल बटर चहा विकणाऱ्या बाया असू देत चेहेऱ्यावर हसू आहेच. तुमच्याशी प्रेमाने बोलण्याची तयारी आहे. या बायांच्या आणि  माझ्या आयुष्यात कितीतरी तफावत होती पण जेव्हा त्या उत्साहाने म्हणायच्या, दीदी ये बटर चाय  पिके देखो , गरम मोमोज खाके देखो तेव्हा सगळी अंतर सांधली जायची. त्या उत्साही बायांकडून आम्ही मोमोजची पाककृती सुद्धा शिकून घेतली. 

   लेहच्या मार्केटमध्ये आम्ही सगळ्यांनी  एका बाईकडून जरदाळू (Apricot) घ्यायचे ठरवले. तेव्हाची तिची धावपळ आणि लगबग मनात खूप काही हलवून गेली. एकाचवेळी २०-२५ किलोचा माल विकला जाणार या कल्पनेने तिला आनंद झालाच असणार. पण एवढ्या ८-९ जणींना त्या एप्रिकॉटसाठी बॉक्स हवे होते. आता एवढे बॉक्स एकाचवेळी आणायचे कुठून? तिने पटापट जवळच्या दुकानातून बॉक्स मिळवले,त्यात आमचा माल भरला. तिच्याकडून माझा बॉक्स घेताना माझ्या मनात आलं , वर्षातून किती वेळा तिला असा  आनंद  मिळत असेल ? 


लडाखमधल्या अती उंचावरच्या आणि जेमतेम दोन गाड्या   एकावेळी जाऊ शकतील अशा रस्त्यांवरून प्रवास हासुद्धा एकप्रकारचा साहसी अनुभव आहे. ड्राएवरची थोडीशी  जरी चूक  झाली तर सगळं समाप्त  !   एका बाजूला उंचच उंच पर्वत आणि दुसऱ्या बाजूला भोवळ आणणारी दरी अशा रस्त्यांवरून तासनतास गाडी चालवायची हे  सोपं काम नक्कीच नाही. या रस्त्यांवरून जाणाऱ्या गाडयांचेही काही ठरलेले प्रोटोकॉल आहेत. रस्ते इतके छोटे आणी दगडधोंड्यानी भरलेले असतात की ड्राएवर लोकांनी एकमेकांशी सहकार्य केलं नाही तर गाडया अडकूनच पडतील तासनतास. एखाद्या अगदीच चिंचोळ्या रस्त्यांवरून दोन्ही गाडया सुखरूप पार पडल्या की दोन्ही ड्राएवर मान डोलावून किंवा हात हलवून एकमेकांना पसंतीची पावती देणार. कधी कधी रस्त्याची कामं चालू असतात. रस्ता सपाट करण्यासाठी रोलर फिरत असतो. त्याचं काम पूर्ण होईपर्यंत त्याच्या दोन्ही बाजूच्या गाडया थांबून रहाणार. अशावेळी मग समस्त ड्राएव्हर मंडळींना १५-२० मिनिटांची उसंत मिळते. मग त्यांच्या एकत्र येऊन शिळोप्याच्या गप्पा. मला उगाचच कुतूहल वाटायचं की ह्या ड्राएव्हर मंडळींच्या गप्पांचे विषय काय असतील. गाडीत बसलेल्या, शहरातून आलेल्या , सर्वस्वी वेगळी जीवनशैली असणाऱ्या माझयासारख्या लोकांच्या आयुष्याबद्दल यांना कुतूहल वाटत असेल का? आम्हाला आमच्या संपूर्ण ट्रीपसाठी मिळालेला ड्राएवर झाकीर हा आमचा प्रवासातला मोठा आधार होता. गाडी तर तो उत्तम चालवायचाच पण त्याला आजूबाजूच्या परिसराची फार चांगली माहिती होती. आमचे घरदार हजारो किलोमीटर मागे सोडून आम्ही काही बायकाच फिरायला आलो होतो. आम्हाला आमच्या सुरक्षेची काळजी जशी होती तशी ट्रिपचा आनंद मनमुराद लुटण्याची पण इच्छा होती. मध्येच कुठेतरी गाडी थांबवून फोटो काढावेत किंवा नुसतंच निसर्गसौंदर्य अनुभवावं असं आम्हाला वाटायचं त्या प्रत्येक वेळी झाकीर न कंटाळता गाडी थांबवणार. आम्ही विचारलं , यहाँ थोडी देर के लिए रुक सकते है ? की त्याचं उत्तर, जरूर रुक सकते है.आपल्या देशात योग्य स्वच्छतागृह मिळणं हे एक आव्हानच आहे. लडाखमधले प्रवास खूप मोठे वाटेवर क्वचितच काही चहा, नाष्ट्याच्या टपऱ्या. एखादा असा स्टॉप चुकला तर बराच वेळ काहीही मिळत नाही. लांबच्या प्रवासात ठराविक वेळानंतर  जिथे बऱ्यापैकी स्वच्छतागृह असेल अशाच ठिकाणी गाडी थांबवायची ही शिस्त झाकीरने  सगळ्या ट्रीपमध्ये पाळली. त्याची या बाबतीतली संवेदनशीलता आम्हाला फारच भावली. लडाखच्या त्या नितांत सुंदर परिसरात असताना मधूनच मुंबईच्या चुकार आठवणी यायच्या. लडाखमधले ते मुक्त मोकळे दिवस संपवून परत एकदा मुंबईच्या साचेबद्ध आणि घुसमटवणाऱ्या जगात परत जाण्याचा विचारही नको वाटायचा. अशाच एका भावनाविवश क्षणी आम्ही झाकीरला म्हटलं , " आप तो नसीबवाले हो जो इतनी खूबसूरत जगह मे रहते हो " श्रीनगर किंवा मनालीच्या पुढे कधीही न गेलेल्या त्याचं उत्तर होतं , " आप भी आ जाओ यही पे  "  त्याचं उत्तर अगदी सहज आलेलं होतं. आम्ही काही गहन प्रश्न विचारला आणि त्याने त्याचं विचारपूर्वक उत्तर दिलं असा प्रसंगच नव्हता तो. तरी त्याचं सहज आलेलं उत्तर खूप लोडेड होतं. त्याच्या  रौद्र तरीही नितांत सुंदर निसर्गाच्या सानिध्यातल्या आयुष्याचं ते सहज सार होतं. आमच्या सगळ्या जीवनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं होतं. प्रश्नांची उत्तरं सोपी असू शकतात याची हळूच जाणीव करून देणारं होतं. 





Tuesday, 5 September 2017

My first ever romance with water....



let me get it clear right in the beginning...I am extremely scared of water! my heart was beating fast when I was listening to the instructions before our river rafting . I was surrounded by a bunch of enthusiasts who loved rafting, who kept telling me that its indeed a big enjoyment,no need to worry. Yeah, there was no way they could hear my heart beating faster, they couldn't  see the butterflies flying in my stomach. 

And I still got onto a raft for rafting in Zanskar river near Leh. Before boarding the raft, we got detailed instructions about dos and donts. At the end of those instructions , I was convinced that I would simply kick and shout if I fall in that cold water!lolz, I wouldn't remember any dos and donts.
with a heavy heart and shaking legs, I boarded a raft along with my friends. I was telling myself, everything will be fine, I wouldn't get drowned, I wouldn't fall off the raft! We start moving in our raft. I see a huge water flowing in front of me. Karakoram ranges of Himalayas overpowering us from both the sides! sheer view of cold water soothes my nerves immediately. Cool and shrill air in Himalayas give me the confidence of wading through those waters. 


And comes my first challenge! our raft is about to ride waves  of whats called rapid!Gosh, you have no moment to think or to get scared. You simply ride those waves going up and down. Cold waters of Zanskar splashing all over your body . You neither have  time to notice a deep gorge forming in your abdominal cavity nor time to notice your shaking hands and legs. For me the moment of riding on that first rapid is a liberation. The moment my raft rides that rapid, giving me no time to feel my fear, my romance with water starts! I feel the cold waves of Zanskar lapping up my raft,my paddle,my face,my hair. The stiff body breaks the barriers of fear and flows with the river. Just when I have managed to survive the first rapid in my rafting journey  I see a small kayak sailing through the water.This very kayaker is going to keep me safe in the river. Seeing him sail through those waves is a sheer beauty. Fluid movements of the kayak and pleasure on the face of the kayaker makes you fall in love with rafting. Gives you the confidence to paddle through those waters. Mind you, the kayaker is fun to be with, you ask for a splash from him and he is more than willing to gift you a freezing cold water splash with his paddle! 


My first splash came even before I realized its coming! And then I realized the pleasure and excitement of it. A person who had incredible fear of water is shouting and demanding a splash! In the entire rafting journey, I did enjoy a few splashes from our kayaker. The force with which the splashes came on us, reminded me of what kayaker said right in the beginning, Water is my passion as well as profession. 

My rafting ends where Zanskar and Indus river meet, at The Sangam. I see waters of different colours meeting each other. I saw a passion sailing on water.  On the shore I see a professional helping us to get out of rafts and quickly move to the warmth of our vehicles. Kayaker's words keep ringing in my mind, Water is my passion as well as profession. 










Thursday, 17 August 2017

बेरी पुलाव,धानसाक,बक्लावा आणि खूप सारा साधेपणा ....



माझं ऑफिस दक्षिण मुंबईतल्या बॅलार्ड इस्टेट या परिसरात आहे. अनेक जुन्या दगडी इमारतींनी हा भाग फुललेला आहे. एक दिवस एक मित्र ऑफिसला येणार होते त्यांनी आधीच फोन करून सांगितलं आपण तुझ्या ऑफिसजवळच्या ब्रिटानिया आणि कंपनी या हॉटेलात जाऊ. खरतर हे हॉटेल माझ्या ऑफिसच्या बाजूलाच आहे पण त्याच बाह्य रूप काही विशेष आकर्षक नसल्यामुळे मी कधीच तिथे गेले नव्हते. गेल्यानंतर मात्र बराच मोठा खजिना माझ्या समोर आला.  मी अगदी कट्टर शाकाहारी आहे त्यामुळे पारशी खानापिना जिथे आहे तिथे मला काय स्कोप असणार असं वाटणं सहाजिक आहे पण ब्रिटानिया आणि कंपनीने माझी निराशा केली नाही. हजार एक वर्षांपूर्वी पर्शिया मधून आलेला झोरॅष्ट्रियन समाज हा प्रामुख्याने पारशी समाज म्हणून आपण ओळखतो. मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय जीवनात या समाजाचं मोठं योगदान आहे. दादाभाई नौरोजी, अदी गोदरेज, टाटा, भाभा, शापूरजी पालनजी अशी अनेक नावं सहज आठवतात. पारशी समाज हा शांतताप्रिय आणि कोणाच्या अध्यात मध्यात नसणारा आहे.त्यांची वेगळी संस्कृती अजूनही ते नेटाने जपून आहेत .  या हॉटेलच्या बाह्यरूपापासून ते इथल्या वेटर्सपर्यंत आणि हॉटेलातल्या सगळ्या वातावरणापर्यंत प्रत्येक गोष्टीत पारशी छाप जाणवत राहातो.


पारशी समाजाचा साधेपणा या हॉटेलांच्या रूपातही उतरलेला आहे. हे हॉटेल ९४ वर्षांचं आहे. ९४ वर्षात फार काही बदल इथे झाले आहेत असं वाटत नाही. इथल फर्निचर ८०-९० वर्ष जुनं आहे हे बघूनच कळतं. आजकाल हॉटेलांमधल्या टेबलांवर टेबलक्लॉथ सहसा दिसत नाहीत. पण इथे लाल पांढऱ्या चौकडीचा टेबलक्लॉथ सर्व टेबलांवर नीटनेटका पसरलेला असतो. प्रत्येक टेबलावर ग्लासमध्ये टिश्यू पेपरचा एक मोठा मनोरा उभा केलेला असतो. ह्या मनोऱ्यातले पेपर इकडे तिकडे गेलेले, मधलाच टिश्यू पेपर काढल्यामुळे दोन पेपरांमध्ये अवास्तव जागा शिल्लक आहे असं तुम्हाला दिसणार नाही. अनेक मोठ्या हस्ती इथे येऊन गेल्या आहेत, अनेकांनी या हॉटेलविषयी यांच्या मालकांविषयी भरभरून लिहिलेलं आहे पण या सगळ्याचा देखावा हॉटेलात कुठेच दिसत नाही. नाही म्हणायला हॉटेलचे सध्याचे मालक बोमन कोहिनूर केव्हा केव्हा जुने फोटो दाखवतात आपल्याला आपल्या टेबलापाशी येऊन. बोमन कोहिनूर स्वतासुद्धा अनेक वेळा ऑर्डर घेताना दिसतात.   नवरोझसारख्या महत्त्वाच्या दिवशी या हॉटेलबाहेर फुलांची साधी पण सुंदर सजावट केलेली असते. पण नवरोज आहे म्हणून काही हे हॉटेल जास्त वेळ चालू असत नाही. दुपारी १२ ते ४ हीच वेळ याही दिवशी. हॉटेलात एक मेझनाईन भाग आहे ज्याला आपण माळा म्हणू शकतो असा. इथे पण जेवायला बसण्याची सोय आहे. टेबल खुर्च्या तशाच नीटनेटक्या मांडलेल्या आहेत. पण खालची जागा पुरत असेल तर उगाचच त्या माळ्यावरचे  दिवे,पंखे चालू असलेले तुम्हाला  दिसणार नाहीत. इथली क्रोकरीसुद्धा साधी आणि सोयीची आहे. त्याच्यात जरासुद्धा फॅन्सीपणा दिसत नाही. काचेच्या जाड प्लेट्स,बाउल,काचेचेच मोठे ग्लास, काटे, चमचे स्टेनलेस स्टीलचे. भाताचे प्रकार किंवा पोळ्या येतात पसरट प्लेटमधून. बाकी भाज्यांचे प्रकार येतात खोलगट बाऊलमधून. उगाच अनेक प्रकारची  भांडी लागतच नाहीत. 



ब्रिटानिया हे हॉटेल इथल्या बेरी पुलावसाठी प्रसिद्ध असले तरी खास पारशी असा धानसाकही आवर्जून खायला पाहिजे. इथला बेरी पुलाव शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारात मिळतो. तो पाहुनच डोळे सुखावतात. जीभही सुखावणारच. बोमन कोहिनूर यांची पत्नी बचन हिने या बेरी पुलावाची सुरुवात ब्रिटानियामध्ये केली. या पुलावातल्या बेरी त्यावेळी इराणामधूनच यायच्या. एरवी पुलाव प्रकारांमध्ये असणारा तेलकटपणा या बेरी पुलावात बिलकुलच दिसत नाही. कुठचे कृत्रिम रंगही ह्यात वापरलेले जाणवत नाहीत. धानसाक हीसुद्धा खास पारशी चीज. ब्राऊन रंगाचा भात आणि त्याच्याबरोबर उसळीसारखा पदार्थ.हा साक डाळी आणि भाज्यांचं कॉम्बिनेशन असतो.  या भाताचा स्वाद अगदी भुरळ घालणारा असतो. 





धान सार्क,बेरी पुलाव हे इथले नेहेमीचे पदार्थ. पण नवरोज जवळ आल्यावर इथे मिळणारा बक्लावा खास असतो. हा बक्लावा इराणवरूनच आलेला असतो. मी उत्साहाने हा बक्लावा खाण्यासाठी गेले ब्रिटानियामध्ये. नेहेमीचा धानसाक,बेरी पुलाव झाल्यावर वेटरला सांगितलं बक्लावा दे. तो म्हणाला एक? मी म्हणाले हो आधी एक दे मग बघू. मग समोर आला तो छानसा लाल रंगाचा चपटा डबा ज्यावर सोनेरी अक्षरात काहीतरी लिहिलं होतं . मला ना कळणाऱ्या भाषेत. मी त्याला डबा उघडून द्यायला सांगितलं. त्याने माझया अज्ञानाबद्दल बिलकुल तुच्छता ना दाखवता मला सांगितलं, हा फ्रीझमधला आहे छान लागणार नाही. मी तरीही हट्टाने म्हणाले, थोडीशी चव बघते. त्या डब्यातल्या त्या छोट्या नीटस कापलेल्या वड्या पाहूनच मन सुखावतं. गुलाबपाण्याचा अगदी मंद वासपण दरवळला लगेचच. मी जेव्हा हॉटेलातून बाहेर निघाले तेव्हा काउंटरवरच्या पारशी बाबाने मला अतिशय प्रेमाने सांगितलं, ह्या बकलावाची मजा तो गरम केल्यावरच येते. एकदा तो गरम केला की त्याचे तूप सुटेल आणि गुलाबपाण्याचा वास येईल मग तो खायला तुला खरी मजा येईल" बक्लावा हा पदार्थ तुर्कस्तान आणि इतर अनेक मध्य आशियाई देशांमधून केला जातो. पण इराणियन बक्लावा या बकलावांपेक्षा थोडा वेगळा असतो. त्यात मुख्यतः बदाम आणि पिस्ते असतात आणि त्यावर गुलाबपाणी शिंपडलेलं असतं. इतर ठिकाणी मिळणाऱ्या बक्लवापेक्षा इराणियन बक्लावा थोडा सुका असतो. घरी पोचल्यावर मी ब्रिटानियामध्ये मिळालेल्या सल्ल्यानुसार बक्लावा गरम करून खाल्ला. आपल्याकडच्या इतर मिठायांसारखा हा बक्लावा रुबाबदार नसला तरी लक्षात राहावा असा आहे. त्याची छोटीशी चौकट  आकाराची वडी खाताना साधेपणातल्या सौम्य सौंदर्याची जाणीव करून देते. पारशी समाजाच्या साधेपणाशी नाळ जुळलेला हा बक्लावा लक्षात राहील असा. 








Sunday, 18 June 2017

मोहम्मद अली रोड..भेंडी बाजार.. रमझान


मुंबईतला मोहम्मद अली रोड किंवा भेंडी बाजार सारखा परिसर माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मराठी त्यातही ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या बाईसाठी अगदी वर्ज्यच म्हणावा असा. वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत मी कधीच इथे गेले नव्हते. माझ्या आयुष्याची बरीचशी वर्ष मी दक्षिण मुंबईतच घालवली असली तरी भेंडी बाजारला जाणं माझ्या विशलिस्टमध्ये असण्याची काही शक्यताच नव्हती. पण रमझान च्या निमित्ताने या परिसरात फेरफटका आणि खाना पिना असा कार्यक्रम वरिष्ठ पत्रकार रफिक बगदादी करणार असं मला कळलं आणि मी नागपाड्याजवळच्या सार्वी हॉटेलपाशी पोचले. नागपाडा पोलीस स्टेशनच्या जवळ जिथे क्लेअर रोड, मुंबई सेंट्रल डेपोवरून येणारा  रोड मिळतात त्या चौकात एका कोपऱ्यावर हे सार्वी हॉटेल आहे. बघून जाण्याची इच्छा व्हावी असं रूप बिलकुलच नाही. त्यात मी शाकाहारी. सादत हसन मंटो या इंडो पाकिस्तानी लेखकाचं घर इथून अगदी जवळ आहे. असं म्हणतात की मंटो इथे चहा प्यायला येत असे. राज कपूर, दिलीप कुमार असे सेलेब्रिटी इथून खास कबाब मागवत असत. पण आजच्या भाषेत या सार्वीचा यूएसपी आहे इथली मऊ रोटी. तंदूर रोटी पण एरवीचा चिवटपणा बिलकुल नाही. काहीजणांच अस म्हणणं आहे की ही रोटी गव्हाच्या कोंडयापासून बनवलेली असते. कशानेही बनवलेली असो  शाकाहारी व्यक्तीलाही इथे खायला लावण्याचा गुण या रोटीत आहे हे नक्की. 

सार्वीवरून नागपाडा पोलिसस्टेशनच्या मागच्या बाजूचा रस्ता आहे जो पुढे मोहम्मद अली रोडला लागतो त्या रस्त्यावर अनेक जुन्या बिल्डींग्ज आहेत. इथे पूर्वी मोठ्या प्रमाणावर ज्यू वस्ती होती. याच परिसरात एक सायनोगॉगही आहे. पूर्वी याच रोडवर एक कहावाच प्रसिद्ध दुकान होतं. कहावा हे सध्याच्या ग्रीन टी सारखं पेय असतं . या कहावाच्या दुकानात हुक्का सुद्धा मिळायचा. मुंबईमध्ये पूर्वी खूप ज्यू समाज होता. त्यांची आडनावंसुद्धा मराठी आडनावांसारखी असायची. हा रस्ता संपवून मुख्य रस्त्यावर उजव्या बाजूला वळलं की एक दारूचं दुकान आहे. आता तुम्ही म्हणाल की दारूचं दुकान आहे यात काय विशेष? विशेष असं की या दुकानाच्या नंतर उजवीकडे म्हणजे अगदी व्हीटी परिसरापर्यंत आणि डावीकडे जवळ जवळ लालबागपर्यंत दारूचं दुकान नाही. मुसलमान वस्ती जास्त असल्यामुळे इथे दारूचं दुकान नाही. 
या रस्त्याला एकदा आपण लागलो की city never sleeps हे मुंबईच वर्णन अगदी खास अनुभवाला येतं. हा सगळा वेगवेगळ्या मार्केट्सचा परिसर आहे. भायखळ्याचं भाजी आणि फळं मार्केट, पूर्वीच्या केळ्याच्या वखारी जिथे सध्या आंबे आहेत, बाकी अनेक गोष्टींची शेकड्याने दुकानं आहेत, मनगटी घड्याळं, मुस्लिम समाज वापरत असलेले कपडे, बायकांचे बुरखे,अत्तरं. रात्री १२ वाजता सुद्धा हा परिसर धो वाहत होता. अशा  वाहनांच्या,माणसांच्या कोलाहलातही रस्त्याच्या कडेला शांत झोपलेले अनेक मजूर लोक होते. रमजान स्पेशल फेरफटका करण्यापुरताच माझा या जगाशी संबंध आलेला. इथून चालताना सुद्धा मला कठीण जात होतं. इथले हे मजूर वर्षानुवर्षं असंच कष्टाचं आयुष्य जगत असतील. येणार प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी कष्ट आणि किमान पोटभर जेवण्याची अपेक्षा घेऊन येत असेल. त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत असतील का माहीत नाही पण दिवस असाच रस्त्याच्या कडेला एखाद्या हातगाडीवर किंवा रस्त्याच्या कडेला प्लास्टिक पसरून आडवं होऊन संपत असेल. "तू कशाला तिकडे जातेस, तिथे रस्त्यावरचे लोक आपल्यासारख्या माणसांकडे डोळे फाडून पाहात असतात" असं कोणीतरी मला म्हणालं होतं  त्याची चरचरीत आठवण ह्या लोकांना पाहिल्यावर मला झाली. बघतील नाहीतर काय? वर्षातून एखाद्याच रमझान महिन्यात आमच्यासारखी पांढरपेशा समाजाची माणसं रात्री तिथे जात असणार. आमचे कपडे आमचं बोलणं आमचं वागणं सगळंच वेगळं त्यांच्यासाठी. रात्री अपरात्री अशा गर्दीत कोणी फिरायला आणि खायला येतं याची त्यांना गम्मत वाटत असेल का? आमच्या सुखासीन आयष्याचा त्यांना हेवा वाटत असेल का असे विचार करत करत मी बोहरी समाज जास्त प्रमाणात आहे अशा परिसरात पोचले होते. हा परिसर इतर परिसरापेक्षा कमी गजबजलेला, तुलनेने स्वच्छ आणि व्यवस्थित. इथलं ताज आइस्क्रीम प्रसिद्ध आहे. तवक्कल हे मिठाईचं दुकानही प्रसिद्ध आहे. 
साधी फिरनी,केशर फिरनी,मँगो फिरनी, मालपुवा,रबडी असे अनेक खास गोड पदार्थ इथे चाखलेच पाहिजेत. 


इथून पुढे आम्ही रस्ता ओलांडून "मुगल" परिसरात गेलो. इथे शिया आणि सुनी वस्ती जास्त आहे. इथल्याच एका गल्लीत निळी मशीद आहे. मुघल मशीद म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. जगभरात विशेषतः सेंट्रल आशियाई देशांमध्ये निळ्या रंगाचे काचकाम असणाऱ्या अनेक मशिदी दिसतात. भेंडी बाजार परिसरातली ही मशीद १८६० मध्ये एका इराणी व्यापाऱ्याने बांधली असं मला गुगलवरून कळलं. याच मशिदीच्या जवळ एक हमाम आहे. मला तर हा हमाम शब्द फक्त ऐकूनच माहीत होता. कधी पाहण्याची वेळ आलेलीच नाही. ह्या हमामचा वापर फक्त १५० रुपयात करता येतो असं तिथल्या गार्डने आम्हाला सांगितलं. त्याच्याच शब्दात सांगायचं तर "अभी पहले जैसे लोग आते नहीं फिर भी चल रहा हैं " आत जाऊन पाहण्याची सोय नव्हती कारण इथे फक्त मुस्लिम समाजाची माणसं जाऊ शकतात. 




इथूनच जवळ आणखी एक दुकान पाहिलं जे वर्षातून एकदाच उघडतं, नवरोजला. इथला बक्लावा हा केकसारखा पदार्थ प्रसिद्ध आहे.  ह्या दुकानाच्या निमित्ताने नवरोज काय आहे हे मला कळलं. मला असंच वाटायचं की नवरोज हा पारशी समाजाचा सण आहे. पण तसं नाही. २१ मार्चला नवरोज असतो. हा नवरोज म्हणजे पर्शियन नववर्ष. आमच्या बरोबर असणाऱ्या एका पत्रकाराने अगदी सोप्या शब्दात या नवरोजबद्दल मला सांगितलं पर्शियन नववर्ष मानणारे समाज हा नवरोज साजरा करतात. मुस्लिम आणि पारशी सुद्धा. 


रमजानच्या निमित्ताने या परिसरात खायला प्यायला जायचा मोठा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून मुंबईत रुळला आहे. म्हटलं तर मी या ट्रेण्डचा भाग आहे म्हटलं तर नाही. नाही अशासाठी कारण इथे शौकीन लोक चिकन, मटणाचे  मुघल पद्धतीचे पदार्थ खायला येतात. मी तर शाकाहारी. पण इथल्या मिठाया सुद्धा तितक्याच तोंडाला पाणी आणणाऱ्या आहेत. 
इथल्या गल्ली बोळांमधून एक अखंड प्रवाह वाहतो आहे. इथे गच्च वस्ती आहे. कष्ट आहेत. शिक्षणाचा अभाव आहे. अस्वच्छता आहे. पण या सगळ्याला एक जबरदस्त जिवंतपणा आहे. वहातेपणा आहे. इथे कुठच्या कोपऱ्यात काय व्यवसाय चालत असतील आणि किती उलाढाली होता असतील याचा विचारही मला करता येणार नाही. इथला डोंगरी भाग तर पांढरपेशा समाजाला अंडरवल्डच्या डॉंन लोकांचा म्हणूनच माहीत असतो. माझ्या विश्वातल्या माणसांना तर आश्चर्यच वाटतं की घरात मांसाहारी जेवण शिजतं तेव्हा वासाने हैराण होणारी बाई रामजणामध्ये भेंडी बाजारात कशी काय जाऊ शकते. जाऊ शकते याचं एकमेव कारण म्हणजे इथला अखंड झरणारा जीवन प्रवाह. जगण्यासाठी माणूस काय काय करत असतो हे इथे पाहायला मिळतं. कमी शिक्षित समाजाचे उत्सव कसे वेगळ्याच उत्साहाने साजरे होतात हे इथे अनुभवायला मिळतं. इथे मिळणाऱ्या रंगीबेरंगी बांगड्या, कलाकुसरवाल्या टोप्या मला जाणीव करून देतात जीवनेच्छेनें रसरसलेल्या माणसांची, त्यांच्या उत्साहाची, अथक कष्टांची. मला माहीत आहे की पुढच्या काही वर्षात हा परिसर झपाट्याने  बदलणार आहे. दाऊदी बोहरा समाजाच्या पुढाकाराने या परिसरात खूप बदल होऊ घातले आहेत. हे बदल अपरिहार्य आहेत. ह्या परिसराचा चेहेरा मोहरा बदलेल तेव्हा मी इथे अनुभवलेले रसरशीत क्षण आठवत राहातील. 








Wednesday, 7 June 2017

छू वाघित्र्या....

Image result for images of  konkan narrow roads
छू वाघित्र्या....हे शीर्षक वाचून कोणीही चक्रावून जाईल. याचा अर्थ किंवा संदर्भ लागणं कठीणच आहे. म्हटलं तर ही एका छोट्याशा गावातली प्रथा आहे म्हटलं तर ती आपल्याला आपल्याच पूर्वजांशी एका परीने जोडणारी गोष्ट आहे. आमच्या कोकणातल्या गावात शिरण्यापूर्वी एक खिंड आहे. साधारण १०० मीटरचा भाग आहे जिथे दोन्ही बाजूला डोंगराच्या उंच भिंती आहेत आणि त्यातून जाणारा रस्ता आहे. हा उंच भिंती असलेला खिंडीचा भाग ओलांडला की गावाची हद्द सुरु होते. या खिन्डीत एके ठिकाणी सर्वसाधारण भारतातल्या कुठच्याही जंगलात, घाट रस्त्यात असतो तसा मोठा दगड उर्फ देव आहे. इथे एखादं नाणं टाकायचं, गाडीचा हॉर्न वाजवायचा आणि छू वाघीत्र्या म्हणायचं अशी प्रथा आहे. ही प्रथा बहुतेक सर्वजण प्रामाणिकपणे पाळत असतात. अनेक वर्षांपूर्वी असेल तशी ती  खिंड आता भीतीदायक आणि धोकादायक राहिलेली नाही. पूर्वी असेल तितकी घनदाट झाडी आता तिथे नाही. पण आहे ती मानवी समाजाची वर्षानुवर्षे चालत आलेली नैसर्गीक प्रवृत्ती. संकटांचा सामना करण्याची हुशारी. खिंडीतला अरुंद रस्ता, दोन्ही बाजूचे उंच डोंगर, गच्च जंगल म्हणजे प्राणी आणि त्यांच्या हल्ल्याची भीती. वेळी अवेळी प्रवास करताना तर हे भीती अजूनच दाट होणार कातर झालेल्या मनांमधून. अनिश्चिततेची, अज्ञाताची भीती कायमच माणसाच्या मनाला वाटत आली आहे. त्यातून वेळोवेळी माणसांनी आपापल्या परीने मार्ग काढला आहे. ही भीती इतकी असणार की धोकादायक गोष्टीचा उल्लेखही सरळसरळ व्हायचा नाही. कोकणात सापाला किंवा नागाला कोणी साप किंवा नाग म्हटलेलं तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. लांबडं  असे सूचक शब्द ऐकायला मिळतील. हा वाघीत्र्या सुद्धा तसाच आहे. वाघ नाही तर वाघित्र्या. नाणं धातूचं असतं टाकलं की खणकन आवाज होणार एखादा प्राणी असेलच तर त्या आवाजाने पळून जाणार. गाडीच्या हॉर्नचं पण तसंच. आवाज केला की धोक्याची चाहूल प्राण्यांना लागणार आणि ते पळणार. आपला मार्ग सोपा होणार. एका दगडाचा देव केल्यामुळे पुढचे धोके टळले की. देवाच्या पायाशी टाकलेली ही नाणीसुद्धा फुकट जात नसणार. गावातलाच एखादा होतकरू माणूस त्याचा पैशातून त्या दगडाच्या देवापाशी तिन्हीसांजेला दिवाबत्ती करत असणार. अगदी काही नाही तर खेळासाठी बॉल घ्यायला किंवा उन्हाळ्यात थंडगार पेप्सीकोला घ्यायला तिथलीच नाणी गावातल्या मुलांच्या कामी येत असणार. दोनच शब्द छू वाघित्र्या, पण माझे विचार कुठच्या कुठे नेणारे. मलाच माझया पूर्वजांपर्यंत पोचवणारे त्यांच्याशी माझा असणारा वर्षानुवर्षांचा धागा कायम ठेवणारे ! 

Sunday, 14 May 2017

A day with Justineras, Beliebers et al...








Just like 44,000 plus fans of JB, I managed to place myself in the Silver Plus stand of D.Y. Patil stadium in Navi Mumbai on 10th May-2017. It was first ever pop music live concert that I was attending in my life and as is being claimed, possibly the biggest live performance ever by an international artiste in India. 
I belonged to a minority called middle aged..in that enthusiastic wave of teenagers i had no choice but to accept that i am indeed well past my young age. One could feel the enthusiasm,excitement,expectations running high in the air. It was just 4 pm and there were 4 long hours before the heartthrob of thousands around me would arrive. So, what do I do for those 4 hours? keep feeling odd woman out? keep looking at youth around me with a long snooty face? yeah, i did none! what did i do then? I tried to feel young. Mind you, you can only try to feel young, you cant look young, you cant behave like a young. Especially when you have thousands around you dressed as per their age, thinking as per their age and behaving as per their age.
        So I witnessed hordes of youngsters walking hands in hands with their boyfriends, girlfriends . They all beaming with enthusiasm about  their idol's performance. Most of the girls in the best fashion-ware, many in such revealing and skimpy clothes..hardly anything left for imagination. As a part of my scheme of feeling young, I had managed to put myself in a borrowed little black dress or LBD as is generally called.  Plunging necklines and shortest possible pants in the stadium took away all my embarrassment about my LBD. And yes, I did have a company. Indeed there were some hapless parents especially moms, who were trying their best to keep pace with changing times. Body language and facial expressions of these parents kept me occupied for long time. There were moms and dads walking with their kids. Kids sure  to be grown up enough to handle themselves and parents just like other parents worried about their kids. A skinny girl in her hot pants looking all around and a father with his hands folded on his chest and looking at infinity!lolz! A boy and girl, enthusiastically telling their father about JB and a father nodding and trying his best to show some interest on his face! And, probably best among the lot were two mothers, wise enough to carry sheets, simply lie on the floor with those sheets wrapped around and enjoying their share of gossip when their kiddos swayed to the music of their generation. When we were getting exhausted with heat and thirst, youth around us was quenching thirst with beer and all kinds of alcohol. I also heard some pearls of wisdom from a friend to the other, "sweetie if you cant handle it, don't take so much!look at me, I had more than you and am fine!" I tried my best not to worry about those 18 something girls, sharing this dialogue with each other. 
          There are many other things happening around to keep us busy, many opportunities to get yourself clicked, write a love message for JB, get some T shirts with slogans about JB. And some mundane stuff like Coke to quench thirst, ice creams to escape from seething heat, boiled corn to stuff yourself.  Middle aged like me would have a second thought before buying the stuff. Though I am trying to think young, my eyes are short of popping out when I know that a glass of Coke will cost me 150 rupees. Madness around me hardly cares for 150 rupees. Many of them had already spent thousands to be there. why would they really worry about hundreds! 
        From 4 to 8, doing practically nothing makes me feel " eh, whats happening, what am I doing here,when is this dude called Justine Beiber going to arrive" . I look around to check who all may be in my party. To my utter disappointment, except for a few parents around, rest of the lot doesn't seem a bit bored. And the moment finally comes, heartthrob of youngsters all around me, a young boy in a white T shirt and probably a baseball pant arrives. Some girls around me faint, some scream,some shout,tears start rolling, emotions start bursting, hustle bustle to have a glimpse of JB. There was music all around us from 4 to 8 but the music after 8 is special for the crowd. Its a music touched by the presence of their dear J.B. It doesn't matter for them even if it is obvious lip syncing. Doesn't matter for them even if his performance appears low on energy. What matters for them is his presence. What matters for them is he speaks their language. What matters for them is one lucky girl got hold of his scarf! What matters for them is he speaks a language of emotions, what matters for them is they can identify with his lyrics,with emotions behind those lyrics. Me with my bare 5 feet height cant even get a glimpse of J.B. But I remind myself of my plan to think young. So I offer to pick up my 11 year old on my shoulders, for her to have a glimpse of Justin Beiber. Mind you, she is still not part of the JB bandwagon. Possibly yet to arrive at teenage. I am trying to be young,smart,modern mom. With a hand from another middle aged mom, I stand there with my 11 year old on my shoulders for 5 long minutes. When I get her down, I ask her, did you see him? she simply says Yes. And then comes a shocking relief for me and my middle aged friend, our little daughters say to us, lets go home, we are hungry. 
          Whoa, climax to our long wait for the concert, efforts to keep our interest in the concert, efforts to be part of the young generation. I leave the D.Y. Patil stadium with mixed feelings. I still don't have the emotional connect with the music of Justin Beiber. I still feel little surprised as to what is so special about this boy. In spite of my best efforts, i do feel worried about the youngsters around me. What warms my heart is a comment from a young girl to her mom, " mom, I know you didn't enjoy it,I enjoyed it to the hilt, am glad that you allowed me to be part of this experience" I sit in the quietude of my  car leaving behind a wave of youth,wave of enthusiasm,wave of madness. I switch on some retro music and the teenager in our car gets back to J.B. with her earplugs! that's life. Generations after generations have their own share of madness. Best to respect each madness if not enjoy! 

Sunday, 7 May 2017

एक मुलाखत लोकसत्ता व्हिवा लाउंजमधली

लोकसत्ता व्हिवा लाउंज मध्ये मुलाखतीसाठी मला फोन आला तेव्हा मला नक्की काय वाटलं? अर्थातच आनंद झाला. आश्चर्यही वाटलं. कारण साधारणतः या कार्यक्रमात सेलिब्रिटी बायका येतात. आपण सेलिब्रिटी च्या कुठच्याही निकषात जरासुद्धा बसत नाही हे मला अगदी पक्कं माहीत आहे. पण एका महत्वाच्या वर्तमानपत्राने प्रकट  मुलाखतीसाठी आपल्याला पात्र समजावं याचा आनंद आणि अर्थातच टेन्शन मला आलं . बरं हा कार्यक्रम मुंबईत असता तर थोडा होम पिचचा फायदा झाला असता पण हा कार्यक्रम "पुणे तिथे काय उणे" इथे. त्यातही ऐतिहासिक टिळक स्मारक मंदिरामध्ये. कार्यक्रमाच्या आधी त्याची पब्लिसिटी इतकी होते की केवळ त्या पब्लिसिटीमुळे माझ्यासारख्या लोकांना सेलिब्रिटीपणाची झलक  मिळते. ४ दिवसांच्या प्रसिद्धीनंतर कार्यक्रमाचा दिवस आला. कार्यक्रमाच्या ठरलेल्या वेळेला मी पोचल्यावर मला कळलं टिळक स्मारक मंदिर हाऊस फुल्ल आहे. पुण्यातल्या मराठी माणसाच्या धैर्याचं मला कौतुकच वाटलं एकदम. 
          साधारणतः ९०० पुणेकरांच्या समोर प्रकट मुलाखत हे बऱ्यापैकी कठीण आव्हान आहे. मुलाखतीतल्याच एका प्रश्नाचं उत्तर देताना मी म्हणाले यूपीएससीच्या मुलाखतीपेक्षा ही मुलाखत कठीण आहे. कारण ती  मुलाखत घेणारे सदस्य फक्त ५. परत ती  ४ भिंतीच्या आड होणारी मुलाखत. ही एका वर्तमानपत्राच्या मंचावर होणारी प्रकट मुलाखत. याची प्रसिद्धी होणार. कार्यक्रमाच्या नंतर मी विचार केला. या कार्यक्रमाला लोक का आले असतील? मला विचारल्या गेलेल्या प्रश्नांवरुनही मी अंदाज बांधायचा प्रयत्न केला की कुठच्या प्रश्नांची उत्तरं आज आपण समाज म्हणून शोधतो आहोत. या मुलाखतीला तरुण वर्ग खूप होता. एमपीएससी आणि यूपीएससी च्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी पुणे हे महत्वाचं केंद्र झालं आहे. त्यामुळे अर्थातच स्पर्धा परीक्षा देणारी, देऊ इच्छिणारी खूप मुलं आली होती. स्पर्धा परीक्षांबद्दलचे प्रश्न त्यामुळे अपेक्षितच होते. या निमित्ताने स्पर्धा परीक्षांकडे महाराष्ट्रातली मुलं एवढ्या मोठ्या प्रमाणावर आता का वळायला लागली आहेत याचंही उत्तर शोधावं  लागलं मला. 
           एखाद्या सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाखतीला लोकं का येतील ? मला असं वाटतं की गेल्या काही वर्षांपासून सरकारचा रोल बदलतो आहे. कसा बदलतो आहे तर कोणेएकेकाळी सरकार हे "मायबाप" सरकार होतं. बऱ्याचशा गोष्टींसाठी सामान्य नागरिक सरकारवर अवलंबून होता. आता तसं राहिलं नाही. सरकारचा रोल हा एनेबलर असा झालेला आहे. सरकाराकडेसुद्धा एका प्रकारचं सर्व्हिस प्रोवाइडर म्हणून बघितलं जातं. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये ग्राहक हा महत्वाचा घटक असतो. त्याच्या म्हणण्याला त्याच्या अपेक्षांना महत्व असतं. आज अनेक नागरिक अशाच स्वरूपाच्या भूमिकेतून सरकारकडे पहात असतात. त्यामुळे त्यांना सरकारी योजना, सरकारची भूमिका, सरकार करत असलेले प्रयत्न याच्याबद्दल जाणून घ्यायचं असतं. सरकारच्या भूमिकेकडे हे नागरिक साक्षेपी दृष्टीकोनातून बघत असतात. समाज माध्यमही खूप सक्रिय आहेत त्यामुळे सर्वप्रकारची माहिती लोकांपर्यंत सतत पोचत असते. त्या माहितीची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची काही नागरिकांची इच्छा असते. अशा वेगवेगळ्या कारणांसाठी सामान्य नागरिकांना कोणाही सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाखतीत रस वाटत असेल. 
          दुसरा मुद्दा स्पर्धा परीक्षांचं जे लोण महाराष्ट्रात पसरत आहे त्याचा. मी जेव्हा १५-१६ वर्षांपूर्वी यूपीएससीची परीक्षा दिली तेव्हा महाराष्ट्रातून परीक्षा देणाऱ्यांचं प्रमाण खूपच कमी होतं आणि परिणामी प्रशासनात येणाऱ्या मराठी अधिकाऱ्यांचही प्रमाण कमी होतं. महाराष्ट्रात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाचा जोर अनेक वर्ष राहिलेला आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या मुलामुलींना देशात परदेशात खूप संधी ९० च्या आणि नंतरच्या दशकात होत्या. त्या संधी गेल्या ५ वर्षात बऱ्याच कमी झाल्या. खासगी क्षेत्रात कामाचा ताण, नोकरीची अनिश्चितता, मर्यादित संधी यामुळे अधिक सुरक्षित अशा सरकारी नोकरीचा पर्याय मुलांना आकर्षक वाटायला लागला. समाज माध्यमांचा प्रभाव आणि प्रसार वाढल्यामुळे महाराष्ट्रातल्या यशस्वी अधिकाऱ्यांच्या यशोगाथा मुलांपर्यंत पोचायला लागल्या. त्यातून मुलांना प्रेरणा मिळायला लागली. स्पर्धा परीक्षांच्या मांडवाखालून गेलेल्या काही मंडळींनी स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनाचे क्लास सुरु केले. एकदा असे क्लास सुरु झाल्यावर मग अभ्यासाच मटेरियल तयार करायचं , क्लास लावणाऱ्या मुलांना राहायची जेवण्या खाण्याच्या सोयीची गरज पडायला लागली . या सगळ्या व्यापातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची एक इंडस्ट्रीच तयार झाली महाराष्ट्रात. दिल्लीत ही इंडस्ट्री बऱ्याच वर्षांपासून आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात विशेषतः पुण्यात ही इंडस्ट्री उभी राहिली. या इंडस्ट्रीचा घटक असलेले उमेदवार मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला काही मार्गदर्शन मिळण्याच्या आशेने आले असतील असं मला वाटतं . 
           कोणत्याही उद्देशाने किंवा अपेक्षेने जेव्हा ९०० लोक आपल्या मुलाखतीला येतात तेव्हा आनंदापेक्षा जास्त वाटतो तो ताण आणि जबाबदारी. या मुलाखतीत अनेक प्रकारचे प्रश्न श्रोत्यांनी विचारले, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी इथपासून ते सरकारी कामात राजकीय दबाव आला तर कसा हाताळावा इथंपर्यंत सर्व प्रकारचे प्रश्न विचारले गेले. या प्रश्नांची योग्य आणि खरी उत्तरं देण्याचं आव्हान होतं. एक सरकारी अधिकारी असल्यामुळे काही खोचक प्रश्नांची उत्तरं विशेष जबाबदारीने द्यावी लागली. कार्यक्रमाच्या आधी आणि कार्यक्रमाच्या नंतर लोकसत्तात सविस्तर वृत्तांत छापून आला. अनेकांनी त्याची दखल घेतली, काही लोकांनी फोन करून अभिनंदन केलं, अनेकांनी सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार समाजमाध्यमातून अभिनंदन केलं. या सगळ्यातून एक लक्षात आलं की अनेक लोक वर्तमानपत्र बारकाईने वाचतात. इलेक्ट्रॉनिक  माध्यमांचा आपल्यावरचा प्रभाव वाढत असला तरीही दररोज सकाळी नित्यनेमाने आणि साक्षेपीपणे वर्तमानपत्र वाचणारे वाचक खूप आहेत. कार्यक्रमाची दखल घेणारे जसे लोक होते तसे कार्यक्रमाची दखल जाणीवपूर्वक ना घेणारेही काही लोक होते. त्यांच्यामुळे पाय पृथ्वीतलावर राहायला खूपच मदत झाली. आपण सेलेब्रिटी झालो आहोत असं मला या मंडळींनी वाटू दिलं नाही त्यामुळे कार्यक्रमाचं कौतुक करणाऱ्यांपेक्षा या मंडळींचं योगदान अधिक लॉन्ग टर्म स्वरूपाचं असणार आहे माझ्यासाठी. अशी एक प्रकट मुलाखत खूपच जाणवून देणारी खूपच शिकवून जाणारी. 

Monday, 1 May 2017

चालता चालता भाग - २

Image result for walk at shivaji park dadar
मी मुंबईतल्या नेपियन सी रोडवर राहाते. इथे एक प्रसिद्ध पार्क आहे प्रियदर्शिनी पार्क. तो माझ्या घरासमोरच असल्यामुळे मी नित्यनेमाने तिथेच चालायला जाते. पण अलीकडेच काही कारणाने काही दिवस शिवाजी पार्कात चालण्याचा योग आला. या ४-५ दिवसांच्या चालण्यातून मला या दोन पार्कांमध्ये चालण्याचे अनुभव कसे वेगवेगळे आहेत हे खासच जाणवलं. 
प्रियदर्शिनी पार्कमध्ये चालण्यात स्टाईल आहे असं म्हटलं तर शिवाजी पार्कात चालण्यात संस्कृती आहे. प्रियदर्शिनी पार्कात चालताना आपण महाराष्ट्रातल्याच एका शहरातल्या पार्कमध्ये चालतो आहोत अस वाटणारही नाही इतकी इथे मराठी भाषा दुर्मिळ आहे.चुकून मराठी कानावर पडली तर आश्चर्याने वळून पाहावे अशी परिस्थिती इथे आहे.  या उलट पार्कात अगदी पुण्याच्या मराठीपासून ते मुंबईच्या मराठीपर्यंत मराठीची रूपं कानावर पडतात. प्रियदर्शिनी पार्कमध्ये चालणाऱ्या मंडळींच्या अंगावर जेवढे फिटनेस गॅजेट्स दिसतात तेवढे शिवाजी पार्कातल्या चालणाऱ्यांच्या अंगावर दिसत नाहीत. प्रियदर्शिनी पार्कची संस्कृती ही प्रदर्शन मांडणारी आहे. प्रियदर्शिनी पार्कमध्ये संपत्तीचं प्रदर्शन आहे तर पार्कात मेहेनतीने मिळवलेल्या गोष्टींचा सार्थ अभिमान आहे. आपल्या मर्जीने आणि आपल्या तत्त्वांनुसार वागणाऱ्या मराठी माणसाचा तोरा पार्कात आहे. प्रियदर्शिनी पार्कमध्ये उंची परफ्युम्सचा मारा आहे तर पार्कात मोगऱ्याचा दरवळ आहे. अगदी शाळेपासून ते आता पेन्शनर झाल्यापर्यंतची दोस्ती शिवाजी पार्काच्या साक्षीने सुरु आहे. प्रियदर्शिनी पार्कमध्ये शेअर मार्केटच्या चर्चा हिरीरीने चालू असतात पार्कात मात्र मराठी संस्कृती पासून ते देशाच्या राजकारणापर्यंत कुठचाही विषय वर्ज्य नाही. प्रियदर्शिनी पार्कमधले आजी आजोबा चालायला येतात ते कायम समवयस्क आजी आजोबांबरोबर येतात. पण शिवाजी पार्कमध्ये आजी आजोबांबरोबर त्यांची नातवंड सुद्धा अधून मधून उत्साहाने चालत आलेली दिसतात. प्रियदर्शिनी पार्कमधल्या आजी अगदी स्टार्च केलेल्या साड्या नेसून सकाळी सकाळी चालायला येतात. या उलट शिवाजी पार्कमधल्या आजी साध्या पण ग्रेसफुल साड्या नेसून आलेल्या दिसतील. आपल्या वयाच्या अनुमानाने इथे माणसं चालताना बोलताना वावरताना दिसतात. मराठी मध्यमवर्गाची सगळी रूपं शिवाजी पार्कमध्ये चालताना अनुभवता येतात. इथे उत्तम आर्थिक स्थिती असूनही साधेपणात आनंद आणि समाधान मानणारी मंडळी जशी आहेत तशीच मुलांना शिकवून मोठे करून बरे दिवस येण्याची स्वप्ने पाहणारी गृहिणी सुद्धा आहे. मुलांना आवर्जून पार्कात फिरायला आणणारे आणि त्यांच्या बरोबरीने उज्ज्वल भविष्याची स्वप्न पहाणारे वडील इथे आहेत. प्रियदर्शिनी पार्कमध्ये पायात चपला घालून चालायला येणारी मंडळी अत्यंत दुर्मिळ आहेत. पण शिवाजी पार्कात चपला, सँडल्स आणि स्पोर्ट्स शूज अशा सर्व अवतारात चालणारी मंडळी आहेत. प्रियदर्शिनी पार्कमध्ये चालताना माझयासारख्या मध्यमवर्गीय व्यक्तीचा जीव सुरुवातीला अगदी दाबल्यासारखा व्हायचा. तुमची एखादी गोष्ट हाय मार्केट नसेल तर तुमच्याकडे तुच्छ कटाक्ष टाकणारी माणसं इथे हमखास असतात. शिवाजी पार्क मात्र सगळ्या प्रकारच्या लोकांना सामावून घेणारा आहे. म्हणूनच ४ दिवसांची पाहुनी असणाऱ्या मला सुद्धा शिवाजी पार्कने आनंदाने सामावून घेतलं. 

Monday, 17 April 2017

चालता चालता

 Image result for morning walk 
मी गेली अनेक वर्ष एकाच पार्कमध्ये चालायला जात आहे. जवळजवळ १०-१२ वर्ष. बहुतेक वेळा मी एकटीच चालते त्यामुळे आजूबाजूचे चालणारे, धावणारे,व्यायाम करणारे सगळे लोक मी बारकाईने बघत असते. सकाळी चालायला जायचा कंटाळा येणाऱ्या लोकांनी कधीतरी येऊन अस आजूबाजूला नुसत पाहिल तरी त्यांना कितीतरी गमती जमती पाहायला मिळतील. चालायला येणाऱ्या माणसांचे काही प्रकार असतात. पहिला प्रकार आहे उत्साही  मंडळींचा. हे लोक लग्नाला,पार्टिला जितक्या उत्साहाने जात असतील तितक्याच उत्साहाने चालायला येत असतात. ही चिरउत्साही माणसं वर्षानुवर्षे चालायला येत असतात. त्यांचा उत्साह दुसऱयांपर्यंत सहजच पसरतो त्यामुळे अशा लोकांबरोबर चालणारा एखादा घोळकाच असतो. मोठ्या मोठ्याने बोलत, जोरदार हातवारे करत ही माणसं चालतात. यांचे हातवारे इतके कि पार्कमध्ये गर्दी असेल तर एखाद्या मागच्या पुढच्या माणसाला बसणारच एखादा!ही उत्साही माणसं समजा कधी एकटीच चालत असतील तर समोरून येणाऱ्या बऱ्याच लोकांना गुड मॉर्निंग, नाहीतर हरी ओम, जय श्रीकृष्णा असं काहिनाकाहीतरी म्हणणारच. कधी कधी तर आपल्यालाही वाटत आपल्या मागच्या-पुढच्या माणसाला केलय गुड मॉर्निंग की आपल्यालाच केलय.  
दुसरा प्रकार आहे तो सिरीयस चालणाऱ्या माणसांचा. ह्या माणसांच्या चेहेऱ्यावरचं गांभीर्य हे चालण्याबद्दलचं आहे की एकूणच आयुष्याबद्दलचं आहे हे कळणं कठीण असतं. पण अशा गंभीर माणसांच्या चालण्यातली शिस्त अगदी बघावी अशीच. प्रत्येक पाऊल मोजून मापून टाकलेलं असतं. हातांची हालचाल सुद्धा अगदी शिस्तीत. ही माणसं सहसा कोणाशीही बोलताना दिसणार नाहीत. ठरलेल्या वेळेला पार्कमध्ये येणार, ठरलेल्या मार्गावर चालणार आणि ठरलेल्या वेळेला पार्कमधून बाहेर. अलीकडच्या काळात ही चालणारी गंभीर माणसं इअर फोन लावून चालताना पण दिसतात. मला नेहेमीच कुतूहल वाटतं की ही माणसं नक्की काय ऐकत असतील. गाणी ऐकत असतील का? की काहीतरी प्रवचन,व्याख्यान ऐकत असतील? माझी फार इछा आहे की अशा एखाद्या गंभीर माणसाचे ईअरप्लग्ज घ्यावेत आणि ऐकावं स्वताच ते काय ऐकत आहेत. आणि समजा कधी मी असे इअरप्लग्ज घेतले आणि ती गंभीर व्यक्ती सैराट पिक्चरची गाणी ऐकत असेल तर माझाच चेहेरा मीच पाहावा असा होईल हे नक्की. अशा सिरीयस माणसांचा सिरियसपणा त्यांच्या कपड्यांमधूनही जाणवणार नक्की. चालायला यायचं म्हणजे चालण्याला चालणारे/शोभणारे कपडे घालून येणार. म्हणजे टी शर्ट तोही शक्यतोवर सौम्य रंगाचा, ट्रॅक पॅण्ट,यांच्या शूजची लेसही अगदी व्यवस्थित बांधलेली असणार. चालताना २-४ वेळा ती लेस सुटली असं यांचं कधीच होत नाही. 
तिसरा प्रकार आहे तो म्हणजे मारून मुटकून चालायला आलेल्या लोकांचा. या मारून मुटकून प्रकारात  उपप्रकार पण असतात. ते कसे? तर काही माणसांना बायकोने मारून मुटकून पाठवलेल असतं चालायला. अशा माणसांच्या फक्त डोळ्यातच झोप दिसत नाही तर त्यांच्या देहबोलीतूनही पेंगुळलेपणा दिसत असतो. काही माणसं तर बायकोबरोबरच मारून मुटकून आलेली असतात चालायला. त्यांची बायको अर्थातच उत्साहाने किंवा वजन कमी करण्याच्या इच्छेने प्रेरित असते ही माणसं मात्र कुठच्याही प्रेरणेशिवाय पण बायकोच्या धाकाने किंवा प्रेमाने चालायला आलेली असतात. 
चौथा प्रकार हा चिरकाल टिकणारा आहे, वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांचा. यात अर्थातच बायका जास्त असतात. या माणसांच्या चालण्यात एक झपाटलेपणा असतो. वजन कमी करायचच, बघतेच आता कस कमी होत नाही वजन ते असा विचार करत ही माणसं चालत असतात. त्यांच्या निश्चयाची झलक त्यांच्या चेहेऱ्यावर दिसते, त्यांच्या चालण्यातून दिसते. या माणसांबरोबर कोणी चालत असेल तर चर्चेचा विषयसुद्धा वजन कमी करण्याचे  १७६० उपाय, ऋजुता दिवेकर काय खा म्हणते, किंवा अंजली मुखर्जी काय खाऊ नका म्हणते असेच असतात. यांच्या गप्पांमध्ये बऱ्याच केसस्टडी पण असतात बरं का. याने २ महिन्यात कसं  १० किलो वजन कमी केलं किंवा तिला कसा अमुक तमुक जिमचा फायदा झाला इत्यादी. अशा माणसांची देहबोली अगदी बघावी अशी असते. कोणी जर त्यांना सांगितलं असेल की चालताना जोरात हात हलवायचे तर ही माणसं जोरात हात चालवणार. कोणी सांगितलं असेल की जॉगिंगमुळे लवकर वजन कमी होतं तर हे लोक जॉगिंग करताना तुम्हाला दिसणार. वजन कमी करणे या एकमेव ध्येयाने हे लोक झपाटलेले असतात. 
अलीकडच्या काळात काही नवीन प्रकारचे लोकही पार्कात दिसतात. हा प्रकार आहे धावणाऱ्या माणसांचा. आजकाल प्रत्येक रविवारी कुठेनाकुठे मॅरेथॉन असतेच. अगदी मॅरेथॉन  नसली तरी मॅरेथॉनच्या सरावासाठी धावण्याचा कार्यक्रम असणारच. तर असे मॅरॅथॉनप्रेमी पार्कमध्ये खूप दिसतात हल्ली. या मॅरॅथॉनप्रेमींचं खास लक्षण कुठचं असेल तर ते म्हणजे त्यांच्याकडे असणारे डिव्हाईस. कोणाकडे फिटबीट तर कोणाकडे गारमीन. कोणाच्या मनगटावर तर कोणाच्या बाहूंवर. मग प्रत्येक फेरीनंतर किती मिनिटात आपली फेरी पूर्ण झाली हे बघण्याचा छंद. अपेक्षित वेळेत फेरी पूर्ण झाली असेल तर एकदम आनंद. अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला असेल तर यांची पुढची फेरी फारच जोशात आणि वेगात असणार हे नक्की. या मंडळींचे कपडेही खास असतात. ड्राय फिट वगैरे खास प्रकारचे टी शर्ट किंवा धावण्याबद्दलचे खास संदेश असणारे टी शर्ट. प्रत्येकाची धावण्याची वेगळी पद्धत. कोणी जोरात धावणारे,कोणी एका लयीत धावणारे, कोणी जग जिंकायला निघाल्याच्या आवेशात धावणारे तर कोणी निव्वळ आनंदासाठी धावणारे. 
खास व्यायाम करणाऱ्या माणसांचा पण एक प्रकार असतो. हाताचे, पायाचे, पाठीचे असे वेगवेगळे व्यायाम ही मंडळी उत्साहात आणि खास शिस्तीत करत असतात. लाफ्टर क्लबच्या सर्व मंडळींचं तर मला कायमच खूप कौतुक वाटत. असा इतकं हुकुमी आणि  पद्धतशीर कस हसायला येत लोकांना मला कळतच नाही. माझी अनेकवेळा इच्छा होते की एखाद्या वेळी जाऊन बघावं आपल्याला पण अस हसायला येत का . पण अजून जमलेल नाही. परत तिथे जाऊन हसायला लागले तर मग रोजच्या रोज चालताना करता येणारी निरीक्षणं राहून जातील. आता उद्या परवा केव्हाही तुम्ही चालायला जाल तेव्हा माझी निरीक्षणं अजमावता येतात का ते बघा. 

अनवट पर्यटन- दागशाई

  एखादा मोठा विकेंड असेल तर फिरायला जाता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं दिल्लीच्या जवळपास आहेत. शिमला,जयपूर,नैनिताल,मसुरी, ऋषिकेश,लॅन्सडाऊन हि  ...