Saturday, 24 December 2016

Dear Milind Soman

Dear Milind Soman,
Am sure you are surprised as to why am I writing an open letter to you, well, I am writing this letter on behalf of hundreds of women who sacrificed their Sunday morning sleep and joined you in Pinkathon at Mumbai on 18th December 2016. Sunday is not any other day for us. We struggle for rest of the days of the week with our eyes on one Sunday. It’s not just rest day for us it’s also a preparatory day for the forthcoming week and still hundreds of us were there at 5 am at Bandra Kurla complex on 18th December. What made us be there? What made us overcome practical difficulties of reaching BKC early morning? We all were there because of love and respect that we have for you, to be precise for your commitment to fitness. You have been a heartthrob for thousands since your entry in the alluring world of modeling many years back. And your charm and charisma continues. It’s that charisma which brought us all to BKC with a will to run 3, 5 and even 10 kms. What a wave of enthusiasm! We dressed in pink and white signature T shirts of Pinkathon and some rare ones in normal running attire. We all in best of our running shoes, some of us even equipped with fitness gadgets. Many of us eager to have a glimpse of you and many hopeful of even having a photo-op with you! lolz! 

        What bound us all together is a passion and confidence that we too can run. There is no dearth of marathons in Mumbai but those marathons scare me. Ladies like me are kind of awestruck by those marathons. We are inhibited by the professionalism of runners in those marathons. Why? our daily life is a run, it’s a struggle, we run behind our naughty kids, we run to catch public transport, we run behind targets and we run behind deadlines, where is a time for us to run on the ground? But we too want to run for fun; we too want to feel good that we can run, we too want to have some "me" time. And you gave us that! 

               
Am sure critics of Pinkathon are in abundance! I am sure many think it to be girly event. Probably professional and even amateur marathoners don't even consider it to be marathon! So what? I say, so what? It makes no difference to us. What matters is the ecstasy we felt at the finish line. What matters is the confidence that we too can run! And we didn't run with long faces or with an eye on our digital clocks. We ran with confidence, we ran with enthusiasm. We ran with the best of our makeup on our faces! We looked at shoes, hairstyle of our fellow runners! We clicked photos even while running! But we ran! We ran to the best of our abilities! We did offload baggage of our families for sometime and ran! We did sacrifice our Sunday morning sleep but we were glad that we did it. One Sunday morning differently spent! One Sunday morning makes us aware about our own individual existence. One Sunday run gave us the time that we very much need for ourselves, time away from our own family, time away from daily chores, time away from never ending responsibilities, time away from nagging expectations.... Thank you for making us truly happy, thank you for injecting confidence among us. Whether we run further marathons or not is not what matters. What matters is the experience- different and pleasant. What matters is the energy that it gave us to continue performing a role of Superwoman…. thank you indeed.....

Tuesday, 20 December 2016

पिंकथॉन


प्रिय मिलिंद सोमण ,
तुला एकदम खुलं पत्रं लिहावं असं मला का वाटलं असा प्रश्न तुलाच काय सगळ्यांनाच पडेल . आणि त्यात काही आश्चर्य नाही. रविवार १८ डिसेंबर पहाटे सव्वापाचला मुंबईतल्या बांद्रा कुर्ला संकुलात ट्रॅफिक जॅम घडवण्याची किमया तुझ्या पिंकथॉनने केली. त्या पहाटे शेकड्याने मुली आणि बायका पिंकथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी बांद्रा कुर्ला संकुलात निघाल्या होत्या. त्या शेकडो स्त्रियांमध्ये मी पण एक होते. रविवारच्या पहाटे उठून एवढ्या सगळ्या बायकांना धावायला प्रवृत्त करायचं ही काही सोपी गोष्ट नाही. मुंबईसारख्या महानगरात तर नाहीच नाही. एका हक्काच्या रविवारकडे नजर ठेवून इथे  सगळेजण रोजचा गाडा हाकत असतात. आम्हा बायकांसाठी तर पुढच्या आठवड्याच्या तयारीसाठी सुद्धा रविवार हवाच असतो. तर अशा रविवारी ३,५ आणि १० अशी वेगवेगळी अंतर धावण्यासाठी अनेक मुली,बायका बांद्रा कुर्ला संकुलात उत्साहाने आल्या होत्या. आम्ही बायका काही कमी नाही पहाटे उठून आलो धावण्यासाठी म्हणून कशातरीच नाही आलो बरं. तुझया पिंकथॉनचे पांढरे गुलाबी टीशर्ट नाहीतर धावण्याचे खास कपडे घालून. बाकी ज्यांच्याकडे फिटनेस बँड, फिटनेस घड्याळं आहेत त्यांना हे आपले गॅजेट्स मिरवण्याची आयतीच संधी मिळाली होती. यातल्या यच्चयावत बायांना मिलिंद सोमणच एवढं कौतुक की चुकून तुझ्याबरोबर फोटोची संधी मिळाली तर म्हणून खास मेकअप सुद्धा करून आल्या होत्या. पहाटे उठून लांबून आली आहे म्हणून एकसुद्धा बाई अव्यवस्थित, अजागळ आलेली नव्हती याच मुख्य श्रेय तुलाच आणि मुख्यतः तुझ्या फिटनेसला. 
१० किमी धावण्याची स्पर्धा सुरु कारण्यासाठी तू समोर येऊन उभा राहिल्याबरोबर पहिल्या रांगेतल्या यच्चयावत बायांच्या काळजाचा ठोकाच चुकला. मला एका अर्थी बरच वाटलं की मी मागच्या रांगेत होते तुझा नुसता आवाजच ऐकू येत होता, माझ्याही काळजाचा ठोका चुकला असता तर धावले कशी असते मी?माझ्या पुढेच धावण्यासाठी सज्ज असलेली एक मैत्रीण चक्क म्हणाली, मिलिंद सोमण दिसला आणि काय पाहिजे ,आता मी नक्की १० किमी धावणार. आम्हा बायकांच्या मनात हा विश्वास निर्माण केल्याबद्दल तुला मनापासून धन्यवाद, आजकाल सगळ्या शहरांमधून मॅरेथॉन होत असतात. मॅरेथॉन मध्ये धावण्याचा एक ट्रेंडच झाला आहे हल्ली. पण माझयासारख्या बायांना ह्या नेहेमीच्या मॅरॅथॉनसचा जरा धाकच वाटतो. आम्हाला काही रोज धावण्याची सवय नाही. आम्ही धावतो ट्रेन पकडण्यासाठी,नाहीतर मुलांच्या मागे. नियमित व्यायाम केला पाहिजे हे आम्हाला पटत असल तरी  त्यासाठी वेळ कुठून आणि कसा आणायचा हा मोठाच प्रश्न असतो आमच्यासाठी. पण या प्रश्नांची उत्तर शोधण्याचं, परिस्थितीतून धावण्याचा मार्ग काढण्याचं बळ तुझ्या पिंकथॉनने माझयासारख्या अनेकींना दिलं. आमच्यातल्या काही जणी एकट्या आल्या होत्या काही आपल्या मैत्रिणींना सोबत घेऊन आल्या होत्या. धावताना सुद्धा हाच पॅटर्न काही एकट्या काही जोडीने आणि काही तर अगदी घोळक्याने. ३ आणि ५ किमी अंतर धावणाऱ्या तर छानपैकी फोटोबिटो पण काढत होत्या. स्पर्धा संपल्यावर सुद्धा मेडल बरोबर,तुझ्या बरोबर फोटो काढण्याची लगबग होतीच अनेकींची. काही लोक या पिंकेथॉनला नावं ठेवत असतील ही काय बायकांची रेस तिथे सिरीयस धावण्यापेक्षा छान दिसायचं, मिलिंदबरोबर फोटो काढायचे एवढंच असतं. पण मला हे पटत नाही. हि फक्त बायकांची रेस आहेच,का असू नये? धावण्यापेक्षा छान दिसत धावण्याला महत्व देणाऱ्या काही मैत्रिणी असतील म्हणून काय बिघडलं? एवढ्या सगळ्या बायकांना धावायला प्रवृत्त कारण हीच मोठी गोष्ट आहे. ज्या क्षणाला मी १० किमी सलग धावून पूर्ण केले तेव्हा मला काय वाटलं ,माझया अशा अनेक मैत्रिणींना काय वाटलं हे जास्त महत्वाचं आहे. आपण हे करू शकतो हा आम्हाला वाटलेला विश्वास महत्वाचा आहे. धावताना आम्हाला मिळालेला आनंद महत्वाचा आहे. थोड्या वेळासाठी का होईना आम्ही आमचं घर,मुलं,संसार सोडून आमच्या समाधानासाठी ,आमच्या आनंदासाठी धावत होतो हे महत्वाचं आहे.इथून पुढे आम्ही अधून मधून धावत राहिलो तरी आमच्यासाठी खूप आहे. तुझ्यापासून प्रेरणा घेऊन स्वतःच्या फिटनेसकडे थोडं लक्ष आम्ही दिलं तरी आमच्या आयुष्यात खूप फरक पडेल. आम्ही एखाद्या दिवशी १० किमी धावलो म्हणून आमच्या रोजच्या आयुष्यात फार काही फरक पडणार नाहीये,आम्हाला रोज लढाव्या लागणाऱ्या लढाया संपणार नाहीयेत पण या लढाया लढण्यासाठी लागणार निरंतर बळ आम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळत असत. एक दिवस १० किमी धावता आल्यामुळे पुढचे आमचे अनेक दिवस उत्साहाचे,आनंदाचे असणार आहेत आणि याला तू निमित्त झाल्यामुळे हे पत्रं. 

Thursday, 15 December 2016

मुसाफिरा



 लक्षद्वीप बेटांच्या समूहात एक छोटंसं बेट आहे अगत्ती . छोटं असल तरी महत्वाचंआहे कारण या बेटावर विमान जातभारतीय उपखंडातून लक्षद्वीप बेटांवर जायचं असेलतर हवाईमार्गाने जाण्यासाठी अगत्तीलाच विमान जातं . जेमतेम  किमी लांबीच हे बेटआहे.  कोचीनहून इथे विमान येतबोटींनी इतर बेटांवर जात येत .संपूर्ण बेटावर एक रिसॉर्टआणि एक सरकारी विश्रामगृहहॉटेल किंवा गेला बाजार चहाची टपरी सुद्धा नाही याबेटावरआम्ही दुपारी अगट्टी बेटावर पोचलो . शासकीय विश्रामगृह समुद्राच्या अगदीजवळबेट इतक लहान आहे कि विश्रामगृहाच्या परिसरात उभं राहून दोन्ही बाजूला पहिलकि समुद्र दिसतो.
दुपार सरल्याबरोबर आम्ही समुद्र किनाऱ्यावर गेलो विश्रामगृहावरून समुद्राकडेजाताना मध्ये काही घर होतीआमच्या चाहुलीमुळे त्या घरातली काही मुलं लगबगीनेबाहेर आली एखाद्या छोट्याशा ठिकाणी असणाऱ्या मुलांना शहरातली माणसं पाहून जीउत्सुकता आणि लाजरेपणा वाटतो तो सगळा ऐवज घेऊन ती मुलं आमच्या मागोमागसमुद्र किनाऱ्यावर यायला लागली आधी जरा बुजत बुजत येत होती पण आम्ही हसतोयबोलायचा प्रयत्न करतोय हे पाहिल्यावर त्यांची भीड चेपली आम्ही  जण होतो आम्हीवाळूत बसल्यावर ती झुंबड सुद्धा आमच्यापासून काही अंतरावर बसली आणि एकमेकांशीखुसपूस अर्थातच त्याचा विषय आम्हीच असणार आमच्या कपड्यांपासून ते आमच्याभाषेपर्यंत सगळंच त्यांना नवीनअगट्टी बेटावर १००मुस्लिम धर्मीय आहेत त्यामुळेछोट्या मुलींचे डोके सुद्धा झाकलेलेमुलांचाही पोशाख पूर्ण बाह्यांचा शर्ट आणि पायजमाअसाच त्यामुळे टी शर्ट आणि आखूड पॅण्ट घातलेले पुरुष आणि बायका हि त्यांच्यासाठीक्वचितच दिसणारी गोष्टलक्षद्वीप बेटांवर जास्त पर्यटक जात नाहीतजे जातात त्यातहीअगट्टी बेटावर जाणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमीत्या मुलांची हसाहशी चालू होती आमचात्यांच्याशी बोलायचं प्रयत्न चालू होता तेवढ्यात एक -१० वर्षांची डोक्यावर हिजाबअसलेली एक मुलगी आली ती आधी या सगळ्या मुलांकडे जरा रागानेच पाहत होतीलहानसशा बेटावर राहणाऱ्या बाहेरच्या जगाशी अगदी क्वचित संबंध येणाऱ्या लहानमुलीच्या मनात शहरातल्या माणसांबद्दल जी असुरक्षितता असेल तीच असुरक्षिततातिच्या चेहेऱ्यावर दिसत होतीत्या सगळ्या मुलांना शक्यतोवर आमच्यापासून लांबघेऊन जायचा तिचा विचार होता पण ती पोरं काही तिला दाद द्यायला तयार नव्हतीआमच्याकडे असणारे मोबाईल फोन,कॅमेरा ह्यांचा त्यांना खूप आकर्षण वाटत होत .आमच्याकडे काय काय खाण्याचे पदार्थ होते ते आम्ही त्या मुलांना देऊ केल्याबरोबर हिहिजाबवली मुलगी एकदम सावध झाली आणि त्या मुलांना दटावयाला लागली कि काहीघ्यायच नाही पण ती मुलं कसली ऐकतात आमच्याकडच्या वस्तू संपेपर्यंत कोणीही तिथूनजायला तयार नाही त्या मुलीने मात्र काही घेतल नाही आमच्याकडूनअंधार पडायलालागल्यावर मुलांना त्यांच्या घरातून बोलावणी यायला लागली आणि अंधार पूर्णपडायच्या आत सगळी मुलं गायब . समुद्राचा चमचमणार पाणी थंडगार वाळू समुद्राचीगाज आणि आम्ही . हिंदी महासागरातल्या एका छोट्याशा बेटावरचा दिवस संपला होताशहरातून आलेल्या  पर्यटकांमुळे त्या बेटावरच्या मुलांची संध्याकाळ वेगळी झाली होतीत्या मुलांनी कधी अगट्टी बेटापलीकडचं जग पाहिलंच नव्हत अगट्टी बेटावर रोज येणारविमान आतून कस दिसत हे सुद्धा त्या मुलांना माहित नव्हतअगट्टी बेटावर येणाऱ्या वस्तूज्या कोचीनवरून येतात त्या कोचिनला कधी जायला मिळणं हि सुद्धा त्या मुलांसाठी फारफार मोठी गोष्ट होती 
https://ssl.gstatic.com/ui/v1/icons/mail/images/cleardot.gif
दुसऱ्या दिवशी हवामान खराब असल्यामुळे आम्ही अगट्टी बेटावरच अडकून पडलोदुसऱ्याच दिवशी नाही तर पुढचे सलग  दिवस मुसळधार पावसामुळे आम्हाला दुसऱ्याकुठच्याही बेटावर जाता आल नाही त्यामुळे सकाळ संध्याकाळ अगतीच्यासमुद्रकिनाऱ्यावर आमचा मुक्काम सकाळच्या वेळेत मुलं शाळेत असायचीसंध्याकाळीमात्र सगळा लवाजमा आमच्या सोबतीला समुद्रकिनाऱ्यावर असायचापहिल्या दिवशीच्याखाऊ मुले दुसऱ्या दिवशी जास्त मुलं आलेली होती आज काही बायका सुद्धा डोक्यावरचेहिजाब सांभाळत आलेल्या होत्या . मी मात्र त्या कालंच्या हिजाबवल्या मुलीची वाट पाहतहोते थोड्या वेळाने ती आली आज तिच्या चेहेऱ्यावर कालचा कडकपणा नव्हता आजयेतानाच तिने आम्हाला थोडं हसूनही दाखवल आम्ही दिलेला खाऊ घेतला आणि चक्क थँकयू म्हटलं . आज तिच्या डोळ्यात उत्सुकता होती आमच्याशी तिला बोलायचं होतंकायबोलायचं असेल तिला आमच्याशी ?आम्ही कुठून आलो ? आमच्या गावालाही असा समुद्रआहे का?आम्ही असे वेगळे कपडे का घालतो?आम्ही शाळेत गेलो होतो का?तिच्यासारखाहिजाब आम्ही  बायका का घालत नाहीकाय माहित तिला काय बोलायचं होतआम्हीनेम?स्कुल?असे तोडके मोडके इंग्रजी आणि हिंदी वापरून बोलायचं प्रयत्न करत होतोतिला थोड फार इंग्रजी येत होतं . तिने शाळेचं नाव सांगितलं तिचा भाऊ होता तो भाऊ आहेहे सुद्धा सांगितलं एवढा संवाद होतोय तोवर तिला घरातून बोलावणं आलं . तिला बोलावलंहे तिलाच कळलं आम्हाला तिच नाव कळलंच नाही ती जायला निघाल्यावर तिचा भाऊकाही जायला तयार नव्हता पण मोठ्या बहिणीच्या समजूतदारपणे ती त्याला समजावूनघेऊन गेली मी हिंदी महासागरातल्या त्या बेटाच्या ठिपक्यावर बसून विचार करत राहिलेकाय करेल आता हि मुलगी घरी जाऊनतिला घरात काय काय काम करावी लागतीलयाछोट्याशा बेटावरच्या तिच्या आयुष्याचा अर्थ काय ?मी हक्काची रजा घेऊन खूप पैसे खर्चकरून इथे सुट्टीवर आले आहे त्या माझा आणि ह्या मुलीचा काय संबंधहिच्यात आणिमाझ्यात काय धागा आहे ? माझी  दिवसांची सुट्टी संपवून मी एका महानगरातल्यापसाऱ्यात विरघळून जाईन आणि हि  ह्या बेटावरच्या संथ जीवनप्रवाहात
दुसऱ्या दिवशी आम्हाला किनाऱ्यावर जाता आलं नाही माझं मन त्या हिजाबवल्यामुलीभोवती घोटाळत राहिल.ती काय करत असेल तिने आमची वाट पहिली असेल कासंध्याकाळीत्या नंतरच्या दिवशी बाकी मुलं आली पण हिजाबवाली मैत्रीण नाही आली.मी मोडक्या भाषेत चौकशी केली मला धड काही कळलं नाही पण तिला घरात काम असावअसा अंदाज मला आलातिने काय ते काम संपवावा आणि यावं इथे या किनाऱ्यावर असमला खूप वाटत राहिल पण त्या दिवशी ती नाहीच आलीत्या नंतरचा दिवस हा आमचाअगट्टी बेटावरचा शेवटचा दिवस होता मी अगदी लगबगीने किनाऱ्यावर गेलेआम्हीपोचल्यावर थोड्याच वेळात हिजाबवाली मैत्रीण आली . हसत हसतमी तिला माझ्याकडचीचकली दिली तिने ती खाल्ली आणि गम्मत म्हणजे अजून मागितली हाताने सांगितलंसुद्धा छान आहे म्हणून . ती मोडक्या तोडक्या भाषेत काहीबाही बोलली मला फक्तकोचीन,लॉट ऑफ स्टडी असे काही शब्द कळलेसमुद्रावर आणि किनाऱ्यावर आता अंधारदाटायला लागला होता आज अजून तिला बोलावणं आल नव्हत आज तिचा भाऊ सुद्धानव्हता मी तिला म्हणाले मी उद्या परत चालले तिच्या चेहेऱ्यावर उदास हसू आलअनादीअनंत काळापासून माणसांची एकमेकांशी ताटातूट होत आली आहे त्या ताटातुटीवेळचीअस्वस्थता,हुरहूर तिच्या छोट्याशा डोळ्यांमध्ये भरून आली होतीया क्षणाचा सामनाकसा करावा या संभ्रमात मी असतानाच ती अचानक उठली आणि बाय म्हणून निघाली मीभानावर आले तेव्हा मला अचानक जाणवल कि आपण हिला हिचं नावच नाही विचारलगेल्या  दिवसातमी जिवाच्या आकांताने ओरडले नेम?नेमतिला प्रश्न कळला .वाऱ्याबरोबर माझ्या कानावर शब्द आले मुसाफिरा ! 
तिला आणि मला जोडणारा धागा होता माणसाच्या शोधक वृत्तीचा. नवीन अनुभवघेण्याच्या उत्सुकतेचात्या बेटावरच्या मुलांच्या आयुष्याबद्दलची माझी उत्सुकता आणिशहरातल्या माझ्या आयष्याची उत्सुकता याचा पोत सारखाच होतामाणसं जीवनप्रवाहातअनेक ठिकाणी जात राहतात अनेक किनार्याना लागत राहतातएखाद्या किनाऱ्यावरमुसाफिरा भेटतेजीवनाच्या प्रवाहीपणाची आणि साचलेपणाची एकाचवेळी आठवणकरून देणारीएका बेटावर स्थिर राहूनही हिंदी महासागराच्या लाटांबरोबर स्वप्नपाहणारी पाहू शकणारी मुसाफिरा . भाषेशिवाय दोन माणसांमध्ये धागा जुळवणारीमुसाफिराअगट्टी बेटावरून मी जेव्हा माझ्या महानगरात पोचेन तेव्हा त्या बेटावरच्याशांत,स्थिर आणि काहीशा कंटाळवाण्या जगण्याची मला आठवण करून देत राहीलमुसाफिराकधीतरी मी संध्याकाळच्या हुरहुरीच्या वेळी एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर जाईनतेव्हा समोरच्या लाटांबरोबर माझ मन पोचेल मुसाफिराकडे.,ती काय करत असेल?तिलाकोचिनला जायला मिळेल का?तिला लॉट ऑफ स्टडी करायला मिळेल कामुसाफिरा मलापरत कधी भेटण्याची शक्यता जवळ जवळ नाहीचमाणसं भेटतात दुरावतात हळव्याक्षणी आठवत राहतात हा नियमच आहे जगण्याचा. त्याची मला सतत जाणीव करून देतराहील मुसाफिरा . 

अनवट पर्यटन- दागशाई

  एखादा मोठा विकेंड असेल तर फिरायला जाता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं दिल्लीच्या जवळपास आहेत. शिमला,जयपूर,नैनिताल,मसुरी, ऋषिकेश,लॅन्सडाऊन हि  ...