Saturday, 10 December 2016

मनातलं पानावर

अलीकडे खूप लोक ब्लॉग लिहितात. सर्व माध्यमांच्या प्रसारामुळे एकंदरीतच अभिव्यक्तीला सगळीकडे चांगले दिवस आलेले आहेत. व्हॉट्स ऍप असो, फेसबूक असो , ट्विटर असो . या सगळ्या माध्यमांमुळे अनेक लोक लिहिते झाले. प्रत्येक छोटं मोठं लिखाण फटाफट शेअर होत. अनेक लोकांपर्यंत पोचत. प्रत्येक विषयांवर कोणीना कोणीतरी व्यक्त होतंच असतं. अशा सगळ्या अभिव्यक्तीच्या गदारोळात आता मीही माझया  ब्लॉगच्या निमित्ताने सामील होते आहे. मी अनेक वर्ष अधून मधून  वर्तमानपत्रांमधून काही मासिकांमधून लिहिते आहे. पण या सगळ्या लेखनाला काही मर्यादा आहेत आणि बंधन आहेत. मी या ब्लॉगवर जे काही लिहिणार आहे त्याला काही वाङ्मयीन मूल्य नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. किंबहुना मी काही लिहिते आहे असा माझा बिलकुल दावा नाही. म्हणूनच आधीच म्हटलंय मनातलं पानावर.. जगण्याच्या रगाड्यात आपणच आपल्याशी कितीतरी बोलत असतो सतत. यातल्या फारच थोड्या गोष्टी इतरांपर्यंत पोचतात. मनातल्या काही गोष्टी मात्र इतरांपर्यंत पोचाव्या अस आपल्याला वाटत राहत. पण नेहेमीच त्या हव्या तशा हव्या त्या माणसांपर्यंत आपल्याला पोचवता येतातच अस नाही. या मनात साठलेल्या गोष्टी, रोजच्या जगण्यातलया तोचतोचपणामुळे आणि नाविन्यामुळेही मनात वेगेवेगळे तरंग उमटत असतात. माझया मनात उमटतात तसे सगळ्यांच्या मनात उमटत असतात. माझया मनातले तरंग लिहिणार आहे माझ्या आनंदासाठी. या निमित्ताने काही नवीन पूल बांधले गेले,नवे बंध जुळले तर आनंदच आहे ... 

No comments:

Post a Comment

अनवट पर्यटन- दागशाई

  एखादा मोठा विकेंड असेल तर फिरायला जाता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं दिल्लीच्या जवळपास आहेत. शिमला,जयपूर,नैनिताल,मसुरी, ऋषिकेश,लॅन्सडाऊन हि  ...