Thursday, 8 December 2016

पाऊस

अवेळी आलेला पाऊस..
लोभावणारा
 हुरहूर लावणारा...
मनाचे सांदीकोपरे 
शोधत आरपार जाणारा
 हवाहवासा आणि
नकोनकोसा..

मी विनवलं चुकवल तरी तू गाठलसच
कधी टपटपत तर कधी धुंवाधार कोसळत
तुझ्या येण्याची चाहूल नेहेमीचीच तरी नवीनवी
तुझा बरसणं पण नेहेमीचच तरी नव्यानं भुलवणार..

No comments:

Post a Comment

अनवट पर्यटन- दागशाई

  एखादा मोठा विकेंड असेल तर फिरायला जाता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं दिल्लीच्या जवळपास आहेत. शिमला,जयपूर,नैनिताल,मसुरी, ऋषिकेश,लॅन्सडाऊन हि  ...